सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

 सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये सानिया शेवटची व्यावसायिक मॅच खेळताना दिसणार आहे.दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा WTA 1000 कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया शेवटच्या वेळी तिच्या चाहत्यांना खेळताना दिसणार आहे.

सानियाने २००३ पासून प्रो-टेनिस खेळायला सुरुवात केली. २० वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या कारकिर्दीला  ३६ वर्षिय सानिया अलविदा करणार आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे.

SL/KA/SL

7 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *