अमृता फडणवीस म्हणताहेत, मैंने मुड बना लिया!
मुंबई, दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रसिद्ध गायिका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच आपल्या हटक्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. आता त्यांचे मैंने मुड बना लिया! हे पंजाबी भाषेतील नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. ते व्हायरल होताच त्यावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करणं सुरु केले आहे.
काही नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पहिल्याच प्रयत्नात खूपच चांगल्या पद्धतीनं त्यांनी पंजाबी गाणे गायले आहे, त्याच बरोबर डान्सची चांगला केला आहे. अशा प्रतिक्रिया त्यांच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या नव्या गाण्याची चर्चा होती. अमृत यांचे हे पहिलेच पंजाबी गाणे आहे. काल त्याचा ट्रेलर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्या गाण्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. ‘मूड बना लिया हे’ हे गाणं टी सीरिजच्या युट्यूबवर आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अमृता यांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे.
SL/KA/SL
6 Jan. 2023