पेन्शनच्या या स्कीम बद्दल तुम्हाला माहित आहे का?

 पेन्शनच्या या स्कीम बद्दल तुम्हाला माहित आहे का?

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वसामान्यांची सेवानिवृत्तीनंतर अर्थार्जनासाठीची चिंता दूर व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २०१५-१६मध्ये अटल पेन्शन योजना सुरु केली.

टपाल विभागात बचत खाते उघडून त्यात दरमहा ठराविक रक्कम भरल्यास वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन सुरु होते. एक हजार रुपयांच्या पेन्शनसाठी ४२ ते १३१८ रुपये आणि पाच हजारांच्या पेन्शनसाठी दरमहा २१० रुपये ते सहा हजार ५९० रुपये भरावे लागतील.

आधारकार्ड आणि पॅनकार्डसोबत दोन फोटो दिले की काही मिनिटात टपाल कार्यालयातून बचत खाते उघडून दिले जाते. त्यानंतर दरमहा त्या खात्यात आपण निश्चित केलेली रक्कम भरावीच लागते. एखाद्या महिन्यात तेवढी रक्कम न भरल्यास १ टक्का दंड लागतो.

तुम्हाला वयाच्या १८ व्य वर्षापासून ४० वर्षापर्यंत हे खाते उघडता येते. वयोगटानुसार दरमहा भरावी लागणारी रकमेत मात्र फरक दिसून येतो. त्यातही एक ते पाच हजारांपर्यंत आपल्याला ६० वर्षांनंतर किती पेन्शन हवी आहे, त्यानुसार हप्ते (दरमहा रक्कम) ठरलेले असतात. ज्येष्ठ नागरिकांना कोणावरही अवलंबून राहावे लागू नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली. या योजनेला अनेकांची पसंती असून बॅंकांमधूनही या योजनेचा लाभ मिळवता येतो.Do you know about this pension scheme?

या योजनेत १ ऑक्टोबर २०२२ पासून बदल करून आयकर भरणाऱ्यांना यातून वगळले आहे. अठराव्या वर्षी खाते उघडल्यास एक हजारासाठी ४२, तर पाच हजारांसाठी २१० रुपयांचा हप्ता जाहीर केला असून योजनेतून किमान एक ते पाच हजारांपर्यंतच पेन्शन मिळणार आहे.अचानक मृत्यू झाल्यास या योजनेद्वारे
‘कॉडप्लस’मधून मदत मिळते.

सद्यःस्थितीत ज्येष्ठ नागरिक झालेल्यांसाठी देखील केंद्र सरकारने विशेष योजना सुरु केली आहे. त्यात एक हजारांपासून १५ लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. त्यावर अन्य कोणत्याही योजनांपेक्षा अधिक ७.६ टक्के इतका व्याजदर मिळतो. गुंतवलेल्या रकमेवर दर तीन महिन्याला व्याज काढता येते. पाच वर्षांसाठीच ही योजना आहे. त्याअंतर्गत एक लाख गुंतवल्यास दरमहा १९०० व्याज तर पाच लाख ठेवल्यास दरमहा ९५०० रुपये व्याज मिळते.

ML/KA/PGB
23 Nov .2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *