केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात होऊ शकते तीन टक्क्यांची वाढ
नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या (Central Govt Employees) महागाई भत्त्यात (DA) होळीपूर्वी वाढ होण्याची शक्यता आहे. सरकार महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करणार आहे जी 1 जानेवारी 2022 पासून लागू होईल. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार वाढीव पगार, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील दिला जाईल.
सध्या एकूण महागाई भत्ता (DA) 31 टक्के आहे, जो घोषणेनंतर वाढून 34 टक्के होऊ शकतो. महागाई भत्ता 34 टक्के झाला तर पगारात 20 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. 7व्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या आधारावर निश्चित केला जातो. ऑक्टोबरमध्ये 3 टक्के आणि जुलैमध्ये 11 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर, सध्याचा महागाई भत्ता 31 टक्क्यांवर गेला आहे.
महागाई भत्ता (DA) हा कर्मचार्यांच्या पगाराचा आणि निवृत्ती वेतनधारकांच्या निवृत्ती वेतनाचा एक प्रमुख भाग आहे. हा भत्ता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Govt Employees) त्यांच्या वेतनावरील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जातो. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्त्यात वाढ करते. सरकारी कर्मचार्यांच्या ठिकाणांनुसार महागाई भत्ता देखील बदलतो.
अहवालानुसार, जर सरकारने पगारवाढीची घोषणा केली तर त्याचा फायदा भारतातील सुमारे 48 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी (Central Govt Employees) आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना होईल. गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. कोविड-19 साथ असतानाही या कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ देण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
The dearness allowance (DA) of central government employees is likely to increase before Holi. The government will increase the inflation allowance by three per cent with effect from January 1, 2022. According to a report released in this regard, the incremental salary will be paid to the employees in the month of March along with the arrears for January and February.
PL/KA/PL/22 FEB 2022