केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ, दीड कोटी कर्मचार्‍यांना होणार फायदा

 केंद्र सरकारकडून महागाई भत्त्यात वाढ, दीड कोटी कर्मचार्‍यांना होणार फायदा

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central employees) बदलत्या महागाई भत्त्यात (dearness allowance) वाढ करण्याची घोषणा केली. 1.5 कोटींपेक्षा जास्त कर्मचार्‍यांना दरमहा 105 ते 210 रुपये मिळतील.
ही वाढ 1 एप्रिल 2021 पासून अंमलात येईल आणि त्यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांच्या (central employees) किमान वेतनातही वाढ होणार आहे. केंद्र सरकार, रेल्वे, खाणकाम, तेल उत्पादन, बंदरे आणि केंद्र सरकारच्या इतर आस्थापनांमधील कर्मचार्‍यांना याचा लाभ मिळेल. ही वाढ कंत्राटी आणि प्रासंगिक कर्मचार्‍यांनाही लागू होईल.
 

कोरोना साथीत मोठा दिलासा

केंद्रीय मुख्य कामगार आयुक्त (सीएलसी) डीपीएस नेगी यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या अंतर्गत कर्मचार्‍यांच्या (central employees) महागाई भत्त्यात (dearness allowance) दरमहा 105 ते 210 रुपये वाढ झाली आहे. कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, नवे दर अधिसूचित करण्यात आले आहेत आणि 1 एप्रिल 2021 पासून अंमलात आले आहेत.
मंत्रालयाने असे म्हटले आहे की देश कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेशी झुंज देत असताना विविध श्रेणीतील कर्माचार्‍यांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. महागाई भत्ता (dearness allowance) सरासरी ग्राहक मुल्य निर्देशांकाच्या आधारे बदलला जातो. महागाई भत्त्यातील बदलासाठी जुलै ते डिसेंबर 2020 पर्यंतचा सरासरी सीपीआय-आयडब्ल्यू चा वापर करण्यात आला आहे.
The Union Ministry of Labor and Employment on Friday announced an increase in the dearness allowance for central employees. More than 1.5 crore employees will get Rs 105 to 210 per month. The hike will take effect from April 1, 2021 and will also increase the minimum wage for central employees.
PL/KA/PL/22 MAY 2021

mmc

Related post