अव्वल दहा क्रिप्टो एक्सचेंजची उलाढाल एक लाख कोटींहून अधिक

 अव्वल दहा क्रिप्टो एक्सचेंजची उलाढाल एक लाख कोटींहून अधिक

नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या (cryptocurrency) उत्पन्नावरील कराच्या घोषणेवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष जेबी महापात्रा यांनी गुरुवारी आपले मत मांडले. त्यांनी सांगितले की अव्वल दहा क्रिप्टो एक्सचेंजेसची उलाढाल 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत क्रिप्टो कराच्या माध्यमातून मोठी वसुली अपेक्षित आहे. या वर्षी एप्रिलपूर्वी केलेले क्रिप्टो व्यवहार करमुक्त नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष म्हणाले की क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) गुंतवणूकदारांनी हे जाणून घेतले पाहिजे की एप्रिल 2022 पूर्वी केलेले व्यवहारांवरही कर आकारला जाईल. ते म्हणाले की भारतात सध्या सुमारे 40 क्रिप्टो एक्सचेंज कार्यरत आहेत. यापैकी 10 एक्सचेंज चांगले व्यवहार करत आहेत. त्यांची उलाढाल 34 हजार कोटी रुपयांपासून ते 1 लाख कोटी रुपयांपर्यंत आहे. ते म्हणाले की या उलाढालीवर जर आम्ही 1 टक्के टीडीएस आणि 30 टक्के कर आकारला, तर आयकर विभागाला किती उत्पन्न होईल याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

2022 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी डिजिटल मालमत्तेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के कर लावण्याची घोषणा केली आहे. यामध्ये क्रिप्टोकरन्सी (cryptocurrency) आणि नॉन-फंजिबल टोकन किंवा एनएफटी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर डिजिटल मालमत्तांशी संबंधित व्यवहारांवर 1 टक्के टीडीएस लावण्याचाही प्रस्ताव आहे.

JB Mohapatra, Chairman, Central Board of Direct Taxes, on Thursday expressed his views on the announcement of tax on cryptocurrency income by Union Finance Minister Nirmala Sitharaman in her budget speech. He said the top ten crypto exchanges have a turnover of over Rs 1 lakh crore.

PL/KA/PL/4 FEB 2022

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *