भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला

 भारताच्या आर्थिक विकासाचा वेग वाढला

नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दुसऱ्या तिमाहीच्या आर्थिक विकास दराचे निकाल समोर आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर (GDP Growth Rate) 8.4 टक्के राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत भारताची अर्थव्यवस्था (Indian economy) 7.4 टक्क्यांनी नकारात्मक झाली होती. अनेक संस्थाकडूनही असेच अंदाज व्यक्त करण्यात येत होते. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल 2021 ते जून 2021 या कालावधीत भारताच्या जीडीपी वाढीत 20.1 टक्के वाढ नोंदवली गेली होती.

 

जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत खासगी अंतिम उपभोग खर्च 19.48 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील तिमाहीत 17.83 लाख कोटी रुपये होता. क्षेत्रानुसार विकास (GDP Growth Rate) पाहिला तर, उत्पादन क्षेत्रात 5.5 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. तर बांधकाम घडामोडी 7.5 टक्के वेगाने वाढल्या. कृषी क्षेत्रातील वाढ 4.5 टक्के होती. खाणकाम क्षेत्रात सर्वाधिक 15.4 टक्के वाढ झाल्याचे पहायला मिळाले.

 

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या (जुलै-सप्टेंबर) तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था (Indian economy) 8.3 टक्क्यांनी वाढेल, तर 2021-22 या संपूर्ण आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन (GDP Growth Rate) 9.4 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज इंडिया रेटिंग्जने व्यक्त केला होता. इंडिया रेटिंग्सने म्हटले आहे की कृषी क्षेत्रातील उच्च वाढीमुळे ग्राहकांचा खर्च वाढला आहे, ज्यामुळे खासगी अंतिम उपभोग खर्चात वाढ झाली आहे. याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे लसीकरणात जवळपास तिप्पट वाढ झाली आहे, जी ऑक्टोबरच्या अखेरीस वाढून 89.02 कोटींवर पोहोचली. जूनअखेर हा आकडा 33.57 कोटी होता.

 

पतमानांकन संस्थेने म्हटले होते की, “सरकारच्या गुंतवणुकीत दुसऱ्या तिमाहीत 51.9 टक्के वाढ झाली आहे, जी चालू आर्थिक वर्षाच्या मागील तिमाहीत 26.3 टक्के होती. त्याचप्रमाणे, 24 राज्यांमधील गुंतवणूक दुसऱ्या तिमाहीत 62.2 टक्क्यांनी वाढली, जी पहिल्या तिमाहीत 98.4 टक्के वाढली होती. असे असूनही, खासगी गुंतवणूक किंवा खर्चामधील सुधारणा संथ आणि काही क्षेत्रांपुरती मर्यादित आहे.

 

The results of the second quarter economic growth rate have come to light. In the second quarter, the GDP growth rate stood at 8.4 percent. India’s economy grew by 7.4 per cent during the same period last year. Similar predictions were made by many organizations.

PL/KA/PL/01 DEC 2021

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *