AI मुळे 2027 मध्ये येणार मोठे संकट – AI सुरक्षा संशोधकाचा दावा

 AI मुळे 2027 मध्ये येणार मोठे संकट – AI सुरक्षा संशोधकाचा दावा

न्यूयॉर्क, दि. २८ : GPT-5ची सुरक्षा तपासणी केलेल्या निकोला युर्कोविच यांनी इशारा दिला आहे की, 2027 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI कोरोनापेक्षाही मोठे संकट निर्माण करू शकते. हार्वर्डमधून शिक्षण घेतलेल्या निकोलांनी पत्र जारी करून घरात 14 दिवसांचा अन्नसाठा, पाणी आणि रोख रक्कम ठेवण्यास सांगितले आहे. ऑनलाइन बँकिंग ठप्प होऊ शकते.

त्यांनी लिहिले—‘पुढील थँक्सगिव्हिंगपर्यंत आपण जिवंत राहू, याची मला खात्री नाही.’ त्यांच्या मते, AI वरील नियंत्रण सुटत चालले आहे. यावर्षी कंपन्यांच्या संगणक प्रणालींमध्ये AIच्या घुसखोरीमुळे आर्थिक नुकसान झाले, मात्र 2027 मध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत हे पत्र 8.09 लाख वेळा पाहिले गेले.

युर्कोविच यांनी शंका व्यक्त केली आहे की AI च्या विकासाचा वेग मंदावला नाही, तर 2030 च्या अखेरपर्यंत मानवता नष्ट होण्याची किंवा नियंत्रण गमावण्याची शक्यता 50% आहे. या धोक्यांपासून वाचलो तरी 10 वर्षांत सध्याच्या बहुतांश नोकऱ्या नष्ट होऊ शकतात.

  • AI माणसांच्या नियंत्रणाबाहेर जाऊन अत्यावश्यक सेवांच्या कार्यप्रणालीत घुसखोरी करू शकतो. 2027 मध्येच AI स्वतःला विकसित करून जगातील सर्वात बुद्धिमान माणसालाही मागे टाकू शकतो.
  • महत्त्वाचे निर्णय घेणारे लोक निष्काळजीपणे आपले अधिकार AI कडे सोपवू शकतात. अशा वेळी यंत्रे मानवी अस्तित्वाच्याच विरोधात असलेल्या उद्दिष्टांसाठी काम करू शकतात.
  • वाईट हेतू असलेले लोक AI च्या वाढत्या क्षमतांचा वापर जैविक शस्त्रे तयार करण्यासाठी करू शकतात. यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याचा धोका आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *