GST नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया होणार सोपी

 GST नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया होणार सोपी

मुंबई, दि. २६ : GST नोंदणी रद्द करण्याची पद्धत अधिक सुलभ करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नवे नियम १ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत. या बदलामुळे पात्र ठरणाऱ्या व्यवसायांना थेट GST पोर्टलवरून आपली नोंदणी रद्द करता येईल. ज्या व्यापाऱ्यांनी किंवा उद्योजकांनी आपला व्यवसाय बंद केला आहे किंवा जे आता GST च्या कक्षेत येत नाहीत, त्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने केंद्रीय GST नियमांमध्ये फेरबदल केला आहे. अर्थ मंत्रालयाने २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना क्रमांक ०८/२०२६-सेंट्रल टॅक्सनुसार हे बदल लागू करण्यात आले आहेत. केंद्रीय जीएसटी कायद्याच्या कलम १६४ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही सुधारणा करण्यात आली आहे.

सुधारित नियमांनुसार नोंदणी रद्द करण्यासाठी अर्ज करणाऱ्या संस्थांना ठराविक निकष पूर्ण करावे लागतील. संबंधित व्यवसायाने सर्व अनिवार्य विवरणपत्रे वेळेवर भरली असतील आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा कर, व्याज, शुल्क, दंड किंवा इतर थकबाकी नसेल, तर पोर्टलवरच नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही आपोआप पूर्ण होईल. अशा यशस्वी प्रकरणांमध्ये अर्जदाराला फॉर्म GST आरईजी-३८ च्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने नोंदणी रद्द झाल्याची माहिती दिली जाईल. अर्ज सादर करण्यापासून ते अंतिम मान्यतेपर्यंतचा संपूर्ण टप्पा डिजिटल माध्यमातून पार पडेल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *