ब्रेन कम्प्युटर इंटरफेसच्या मानवी चाचणीस मंजुरी

 ब्रेन कम्प्युटर इंटरफेसच्या मानवी चाचणीस मंजुरी

न्यूयॉर्क,दि. २६ : अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने इलॉन मस्क यांच्या ‘न्यूरालिंक’ कंपनीला ब्रेन कम्प्युटर इंटरफेसची ‘LINK’ पिव्होटल सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. न्यूरालिंकच्या ‘LINK’ पिव्होटल अभ्यासांतर्गत गंभीर ALS आजारामुळे हालचाल करण्याची क्षमता गमावलेल्या प्रौढ रुग्णांवर ही चाचणी घेतली जाणार आहे. कवटीत बसवलेली नाण्याच्या आकाराची ‘N1 इम्प्लांट’ चिप मेंदूतील विद्युतीय संकेत टिपून संगणकाशी जोडते. यामुळे रुग्ण कोणताही स्पर्श न करता केवळ विचारांच्या जोरावर टायपिंग आणि डिजिटल उपकरणांचे नियंत्रण करू शकतात. हे उपकरण अद्याप प्रायोगिक अवस्थेत असून, या चाचणीच्या यशानंतरच व्यावसायिक वापराच्या मंजुरीचा मार्ग मोकळा होणार आहे.

कंपनीने या अभ्यासाचे नाव ‘LINK’ ( LINK Pivotal Study ) असे ठेवले आहे. कंपनीने या निर्णयाची घोषणा केली असून, ‘इन्व्हेस्टिगेशनल डिव्हाइस एक्झम्पशन’ (IDE) अंतर्गत क्लिनिकल संशोधनासाठी ही परवानगी मिळाली आहे. ‘LINK’ अभ्यासांतर्गत प्रामुख्याने ‘ALS’ (ALS – Amyotrophic Lateral Sclerosis) या गंभीर मज्जासंस्थेच्या आजारामुळे बोलण्याची आणि शरीराची हालचाल करण्याची क्षमता गमावलेल्या (अर्धांगवायू झालेल्या) प्रौढ रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. या क्लिनिकल चाचणीमध्ये सहभागी होणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रियेनंतर सुमारे 24 महिने नियमित तपासणी केली जाईल आणि यंत्रणेची सुरक्षितता व परिणामकारकता तपासली जाईल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *