स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील टिप्पणीवरून सोनिया गांधी यांना नोटीस

 स्वा. सावरकरांच्या पुस्तकातील टिप्पणीवरून सोनिया गांधी यांना नोटीस

पुणे दि २४ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी पुस्तकात करण्यात आलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीवरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी सोनिया गांधी यांना कायदेशीर नोटीस पाठवली असून, संबंधित लिखाणाबाबत १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. निर्धारित मुदतीत समाधानकारक उत्तर न मिळाल्यास न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकातील पान क्रमांक २०१ आणि ४४३ वर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी करण्यात आलेल्या उल्लेखांवर सात्यकी सावरकर यांनी आक्षेप घेतला आहे. या लिखाणाला कोणताही ठोस ऐतिहासिक पुरावा किंवा आधार नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. पुराव्याशिवाय सावरकरांविषयी आक्षेपार्ह विधाने करण्यात आल्याने त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचत असल्याचे सात्यकी सावरकर यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची दखल घेतली होती. त्यांच्या योगदानाचा सन्मान केला होता, याकडे सात्यकी सावरकर यांनी लक्ष वेधले. मात्र, सोनिया गांधी सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सक्रिय झाल्यापासून सावरकर यांच्याविषयी सातत्याने बदनामीकारक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर कायदेशीर नोटीस पाठवून संबंधित विधानांबाबत स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. आता सोनिया गांधी या नोटिशीला काय उत्तर देतात आणि या वादावर पुढे कोणती कायदेशीर भूमिका घेतली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *