NSEL ‘वन-टाइम सेटलमेंटचे पे-आउट जारीकॉर्पोरेट भारताच्या इतिहासातील अशा प्रकारचे पहिलेच फायनान्शियल सेटलमेंट

 NSEL ‘वन-टाइम सेटलमेंटचे पे-आउट जारीकॉर्पोरेट भारताच्या इतिहासातील अशा प्रकारचे पहिलेच फायनान्शियल सेटलमेंट

मुंबई, दी २४
कॉर्पोरेट भारताच्या इतिहासातील पहिल्याच अनोख्या आणि एकमेवा‌द्वितीय अशा नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड (NSEL) च्या ‘वन-टाइम सेटलमेंट’ (OTS) अंतर्गत पात्र दावेदारांना आज पे-आउट जारी करण्यात आले. यामुळे NSEL च्या एक्स्चेंज प्लॅटफॉर्मवरील काउंटर-पार्टी पेमेंट डिफॉल्टच्या प्रकरणाचा सुमारे 14 वर्षाच्या कायदेशीर लढ्‌यानंतर ऐतिहासिक तोडगा निघाला आहे.

हे OTS अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे कारण, मा. न्यायालये, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या रचनात्मक दृष्टिकोनामुळे प्रथमच एखा‌द्या आर्थिक संकटावर सौहार्दपूर्ण पद्धतीने तोडगा काढण्यात आला आहे. याशिवाय, या वन-टाइम सेटलमेंटकरिता रचनात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याब‌द्दल आर्थिक गुन्हे शाखा (EOW), मुंबई आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) हे देखील विशेष उल्लेखास पात्र ठरतात.
यामुळे, अभिमानाने असे म्हणता येईल की, अशा आर्थिक संकटावर न्याय्य, निष्पक्ष आणि सौहार्दपूर्ण मार्गाने तोडगा काढण्यासाठी एक अनुकरणीय आदर्श मॉडेल निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे, न्यूयॉर्क,
लंडन आणि सिंगापूर सारखी जागतिक फायनान्शियल सेंटर म्हणून महाराष्ट्राची दूरदृष्टी आणि विकासाभिमुख परिपक्वता दिसून येते कारण या देशांमध्ये ही भूतकाळात अशाच प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागले होते आणि त्यांनीही अशाच पद्धतीने त्यांचे निराकरण केले होते.

भारताच्या इतिहासात प्रथमच घडलेल्या आणि म्हणूनच मैलाचा दगड ठरलेल्या या न्याय्य आणि निष्पक्ष तोडग्याच्या माध्यमातून भारताला न्यूयॉर्क, लंडन आणि सिंगापूरच्या बरोबरीने आणण्याचे ऐतिहासिक कार्य केंद्र सरकारच्या सक्षम नेतृत्वाशिवाय शक्य झाले नसते.
अशा प्रकारच्या संकटावर मात करून सर्व संबंधितांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवणारे हे महाराष्ट्र मॉडेल इतर राज्येही स्वीकारतील, अशी आशा आहे.
कॉर्पोरेट भारतात यापूर्वी कधीही ऐकिवात नसलेले हे OTS एकमेवा‌द्वितीय आहे कारण NSEL, 63 मून्स आणि त्यांच्या प्रमोटर्सपर्यंत कोणत्याही तपास यंत्रणेला मनी-ट्रेल आढळून आलेला नसतानाही, 63 मून्स ने स्वतःच्या निधीतून हे स्वेच्छेने देऊ केले आहे. संपूर्ण मनी-ट्रेल 17 डिफ़ॉल्टर समूहांपर्यंत गेल्याचे आढळले असून, त्यांच्याकडूनच ही रक्कम वसूल केली जाणार आहे.
मोठ्या संख्येने दावेदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या NSEL इन्व्हेस्टर्स फोरम (NIF) या संघटनेचे अध्यक्ष श्री. शरद सराफ, सदस्य श्री. सुशील जिवराजका आणि व्यवस्थापन समितीच्या आठ सदस्यांनी केलेले प्रयत्न ही विशेष उल्लेखनीय आहेत.

₹1,950 कोटींची ही OTS स्कीम मूळतः NIF ने प्रस्तावित केली होती. त्यानंतर NSEL ने 63 मून्सच्या सहकार्याने NIF चा प्रस्ताव स्वीकारला आणि 5,682 दावेदारांसोबत ‘वन-टाइम,’ सौहार्दपूर्ण, ‘फुल अँड फायनल सेटलमेंट’ साठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT), मुंबई समोर OTS स्कीम दाखल केली.
मुंबईने मतदान प्रक्रिये‌द्वारे NSEL. आणि दावेदारांमधील OTS ला मंजुरी दिली. या मतदानात दावेदारांच्या संख्येच्या आधारे 92.81% आणि दाव्यांच्या मूल्याच्या आधारे 91.35% दावेदारांनी OTS च्या बाजूने मतदान केले.

या सेटलमेंटमुळे दावेदारांना दिलासा मिळाला आहे कारण जुलै 2013 मध्ये आपल्या पेमेंटसंबंधी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात कसूर करणाऱ्या डिफॉल्टर्सकडून रिकव्हरी होण्याची वाट आता त्यांना पाहावी लागणार नाही.

या ऐतिहासिक घडामोडीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. जिग्नेश शाह, मैटॉर आणि कोच, 63 मून्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, म्हणाले, “कॉर्पोरेट भारताच्या इतिहासात हे OTS अभूतपूर्व आहे. भविष्यातील आर्थिक संकटांवर न्याय्य आणि रचनात्मक पद्धतीने तोडगा काढण्यासाठी या OTS ने एक आगळे-वेगळे मापदंड सादर केले आहे. हे ऐतिहासिक OTS प्रत्यक्षात आणण्यासाठी रचनात्मक दृष्टिकोण ठेवणारे केंद्र सरकारचे नेतृत्व, महाराष्ट्र राज्य सरकारचे नेतृत्व, EOW, ED आणि CBI यांसह सर्व तपास यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, माननीय भारतीय न्यायव्यवस्थेचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत. असे म्हटले जाते की, दर ५,५०० वर्षानी ‘सत्यमेव जयते’ च्या इतिहासाची पुनरावृत्ती होते. NSEL लढ्याच्या कुरुक्षेत्रातही ‘सत्यमेव जयते’ची पुन्हा एकदा प्रस्थापना झाल्यामुळे महाभारतातील कुरुक्षेत्राच्या युद्धाची आठवण होते.”

कॉर्पोरेट भारतात इतिहास घडविण्यासाठी सहकार्य केल्याब‌द्दल श्री. सराफ यांनी
केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार तसेच तपास यंत्रणांचे आभार मानले. NSEL आणि

63 मून्स च्या टीमने केलेल्या अभूतपूर्व आणि अत्यंत खडतर प्रयत्नांचीही त्यांनी
प्रशंसा केली. ते पुढे म्हणाले, “हे OTS पे-आउट दावेदारांसाठी केवळ न्याय्य आणि योग्यच नाही तर त्याहून ही महत्त्वाचे म्हणजे, भविष्यात कोणत्याही आर्थिक
संकटावर तोडगा काढण्यासाठी हे OTS निश्चितच एक रोडमॅप ठरेल.”
63 मून्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एस. राजेंद्रन म्हणाले, “हे OTS ऐतिहासिक ठरते कारण कोणत्याही तपास यंत्रणेने किंवा न्यायालयाने 63 मून्स आणि त्यांच्या प्रमोटर्सपर्यंत मनी-ट्रेल स्थापित केलेली नसतानाही, 63 मून्स ने OTS योजनेबाबत सकारात्मक आणि तोडगा काढण्याच्या दृष्टीने पुरोगामी दृष्टिकोन स्वीकारला.”

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, याच नैतिक मूल्यांचे आणि तत्त्वांचे पालन करत, ऑगस्ट 2013 मध्येच NSEL ने 63 मून्स च्या सहकार्याने सुमारे ₹179 कोटींचे पेमेंट केले होते ज्यामुळे ₹10 लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या 7,053 दावेदारांना दिलासा मिळाला होता. ₹10 लाखांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या सर्व दावेदारांना त्यांची 100% थकबाकी मिळाली आहे.

“भारताच्या वित्तीय क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेले हे NSEL OTS सर्व अधिकारी, तपास यंत्रणा, न्यायालये आणि NIF यांचे सहकार्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाशिवाय कधीही शक्य झाले नसते अशी NSEL चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज शर्मा यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *