मुस्लिम नेते हाजी अरफात शेख देतायत रिक्षा, टॅक्सी चालकांना “मराठी बोला – महाराष्ट्र जोडाच्या माध्यमातून मराठीचे धडे

 मुस्लिम नेते हाजी अरफात शेख देतायत रिक्षा, टॅक्सी चालकांना “मराठी बोला – महाराष्ट्र जोडाच्या माध्यमातून मराठीचे धडे

मुंबई, दि १५
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रिक्षा स्टँड, देवनार पशुवध गृह ,गेट नंबर 4, गोवंडी अश्या मुंबई मधील उत्तर भारतीय, परप्रांतीय बहुल भागात रिक्षा-टॅक्सी चालकांना सरकारतर्फे तयार करण्यात आलेल्या पुस्तिका वाटप तसेच तसेच सर्व रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकवण्यासाठी मार्गदर्शन व धडे देण्यात आले.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हिंदी भाषिक तसेच मुस्लिम रिक्षा टॅक्सी चालक ज्याप्रमाणे पांडे जी, गुप्ता जी, शुक्ला जी, अब्दुल रहीम, अब्दुल करीम यांना आम्ही येत्या ६ महिन्याच्या आत मराठी भाषा शिकणारच. तसेच “मराठी बोला – महाराष्ट्र जोडा” असे आवाहन हाजी अराफत शेख यांनी या ठिकाणी येऊन रिक्षा टॅक्सी चालक यांना केले.
याप्रसंगी व्यसन मुक्ती, संघटनेमार्फ़त मोफत गणवेश व अन्नधान्य किट वाटप,रोड सेफ्टी,पर्सनालीटी डेव्हलोपमेंट या पद्धतीचे अभियान मुंबई ,मधील रिक्षा टॅक्सी स्टॅन्ड वर राबविले. याप्रसंगी रिक्षा टॅक्सी चालक व पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. मुंबईतील उत्तर भारतीय तसेच इतर भाषिकांना मराठी भाषेचे चांगले ज्ञान अवगत व्हावे. त्यांनी दैनंदिन जीवनामध्ये मराठी भाषेचे ज्ञान अवगत करून मराठी भाषा बोलावी या दृष्टिकोनाने आणि राज्य सरकारने केलेल्या मराठी सक्तीच्या नियमाप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी मराठी बोला मराठी महाराष्ट्र जोडा असे आवाहन केले आहे या आवाहनाला इतर भाषिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन त्यांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली. लवकरच रिक्षा चालक टॅक्सी चालक मराठी मध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळेल. तसेच मुंबईमध्ये बेकायदेशीर रित्या रिक्षा टॅक्सी आणि बाईक चालवणाऱ्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करून एफ आय आर नोंदवावा असा प्रस्ताव हाजी आराफत शेख यांनी परिवहन मंत्र्यांना केला होता हा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मान्य करून लगेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती भाजपा ट्रान्सपोर्ट सेलचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिली.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *