विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा14 मे रोजी शपथविधी

 विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा14 मे रोजी शपथविधी

मुंबई दि १२ – महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या एक सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी गुरुवार, 14 मे, 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे हे या दहा सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील.

1) डॉ. नीलम गोऱ्हे, 2) ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू, 3) अंबादास एकनाथराव दानवे, 4) डॉ. प्रज्ञा राजीव सातव, 5) प्रमोद शांताराम जठार, 6) झीशन झिआउद्दीन सिध्दीकी, 7) माधवी संजय नाईक, 8) सुनिल विनायक कर्जतकर, 9) विवेक बिपिन कोल्हे, 10) संजय नथ्थुजी भेंडे या नवनिर्वाचित सदस्यांना सभापती शपथ देतील.

या शपथविधी समारंभास विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *