मुंबई पोलीस दलाची मोठी पुनर्रचना

 मुंबई पोलीस दलाची मोठी पुनर्रचना

मुंबई, दि. 11 : गृह विभागाने डिसेंबर 2025 मध्ये प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयानुसार, मुंबई पोलीस दलात दोन नवीन पोलीस झोन आणि चार नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे. पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आणि नागरिकांसाठी प्रशासन अधिक सुलभ करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने हे रचनात्मक बदल केले आहेत.

या पुनर्रचनेमुळे मुंबईत आता दक्षिण, मध्य, पूर्व, पश्चिम आणि उत्तर असे पाच प्रमुख प्रादेशिक विभाग असतील. झोपडपट्टी बहुल भाग आणि अस्तित्वात असलेल्या पोलीस ठाण्यांमधील अंतर लक्षात घेऊन नवीन पोलीस ठाणी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कायद्याचा धाक आणखी वाढणार आहे.

मुंबई पोलीस दलातील या नवीन रचनेमुळे शहरात आता एकूण १५ झोन असतील आणि प्रत्येक झोनचे प्रमुख म्हणून पोलीस उपायुक्त (डीसीपी) कार्यरत राहतील. यापूर्वी बंदर विभागासह शहरात १३ झोन अस्तित्वात होते. या प्रशासकीय बदलांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणे अधिक सोपे होईल आणि सार्वजनिक सेवा वितरणाचा वेग वाढेल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नव्या रचनेनुसार पाचही प्रादेशिक विभागांत आता प्रत्येकी तीन झोन कार्यरत राहतील.

दक्षिण विभागांतर्गत आता तीन झोन असतील. यामध्ये दक्षिण झोन-१ मध्ये कुलाबा, कफ परेड, मरीन ड्राईव्ह, आझाद मैदान, एमआरए मार्ग, डोंगरी आणि सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.

दक्षिण झोन-२ मध्ये पायधुनी, एल. टी. मार्ग, व्ही. पी. रोड, डी. बी. मार्ग, गावदेवी, मलबार हिल आणि यलो गेट या पोलीस ठाण्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नवीन दक्षिण झोन-३ मध्ये मुंबई कोस्टल-१, मुंबई कोस्टल-२, वडाळा आणि शिवडी पोलीस ठाणी असतील.

मध्य विभागाचीही तीन झोनमध्ये विभागणी झाली असून यामध्ये ताडदेव, नागपाडा, भायखळा, वरळी, दादर, माहीम आणि धारावी यासारख्या प्रमुख पोलीस ठाण्यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *