शहाड परिसरात धावत्या कारला भीषण आग : सुदैवाने जीवितहानी नाही.

 शहाड परिसरात धावत्या कारला भीषण आग : सुदैवाने जीवितहानी नाही.

शहाड, दि ११
सध्या पडत असलेल्या अतिउखाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. भरधाव वेगाने धावणारी वाहने देखील कडक उकड्यामुळे वाटेतच बंद पडत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यात शहाड ब्रिज येथील भरधाव वेगाने जाणाऱ्या कारला अचानक रात्री आग लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. वेळीच प्रसंगी चालकाच्या प्रसावधानाने दुर्घटना टळली.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून अचानक लागलेल्या आगीत गाडी जळून खाक झाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजले नसून. या घटनेमुळे वाहतुकीच्या रोडवर एकच खळबळ उडाली होती. या आगीमध्ये काही ब्लास्ट देखील होत होते. रात्रीच्या सुमारास गाडीला अचानक लागलेल्या आगीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *