ताडोबा अंधारीमध्ये नव्या तीन पाहुण्यांचे आगमन
चंद्रपूर दि ११ : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पळसगाव बफर वनपरिक्षेत्रात पुन्हा एकदा आनंदाची चाहूल लागली आहे. पर्यटक आणि वन्यजीव प्रेमींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली ‘विरा’ ही वाघीण आपल्या चौथ्या प्रसूतीत तीन गोंडस बछड्यांसह आढळून आली असून, आतापर्यंत तिने तब्बल तेरा बछड्यांना जन्म देत ताडोबा परिसरातील व्याघ्र संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नव्या बछड्यांच्या आगमनामुळे पळसगाव जंगल परिसरात उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.ML/ML/MS