प्रा. श्याम मानव यांचे ‘बुवा तेथे बाया’ या विषयावर व्याख्यान
मुंबई, दि ७-
लोक बुवा, बुवा बाबांकडे का जातात? बाबा स्त्रियांना कसे फसवतात ? या संदर्भात जनप्रबोधन करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संस्थापक, संघटक प्रा. श्याम मानव यांचे व्याख्यान येत्या मंगळवारी १२ ‘मे’ २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, राजर्षी शाहू महाराज सभागृह दादर येथे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केले आहे. यावेळी जेष्ठ संपादक ज्ञानेश महाराव,माजी पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रसिद्धी पत्रकार दिली आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली ४४ वर्ष विविध माध्यमातून जनतेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचे कार्य करीत आहे.महाराष्ट्र सरकारने २०१३ मध्ये जादूटोणा विरोधी कायदा संमत केला. पण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशोक खरात सारखे बाबा महाराष्ट्रात निर्माण होत आहेत, धीरेंद्र शास्त्री समाजामध्ये अनेक अवैज्ञानिक दावे करतात. अशा बाबांना अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ४० लाखाचं आव्हान दिलेले आहे. बाबा आव्हानातून पळ कसे काढतात? लोक बुवा बाबा कडे का जातात? असे बाबा स्रियांना कसे फसवितात या करीता जनप्रबोधन करण्यासाठी अ भा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने बुवा तेथे बाया या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
यावेळी ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव व माजी पोलीस महासंचालक सुधाकर सुराडकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर व्याख्यान होणार आहे.अशी माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संघटक चंद्रकांत सर्वगोड यांनी दिली आहे. या प्रबोधनात्मक व्याख्यानास सुजान नागरीकांनी अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.KK/ML/MS