Kia ने या इलेक्ट्रिक कारसाठी लागू केला रिकॉल

 Kia ने या इलेक्ट्रिक कारसाठी लागू केला रिकॉल

मुंबई, दि. १४ : Kia India ने या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये आपल्या प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही किआ ईव्ही6 चे फेसलिफ्ट मॉडेल लाँच केले. ज्यामध्ये अनेक अपडेट्ससह नवीन फीचर्स अ‍ॅड करण्यात आली. कंपनीने 17 जानेवारीपासून याचे बुकिंग सुरू केले. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, Kia EV6 साठी कंपनीने रिकॉल जारी केला आहे.

रिपोर्ट्सनुसार, Kia EV6 साठी कंपनीने रिकॉल जारी केला आहे. या इलेक्ट्रिक SUV च्या इंटिग्रेटेड चार्जिंग कंट्रोल युनिट (ICCU) मध्ये बिघाड असल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे कंपनीने या कार परत मागवल्या आहेत तसेच कंपनीने हे सॉफ्टवेअर पुन्हा नव्याने अपडेट करेल. कंपनीने या कारचे 1380 युनिट्ल परत मागवले आहे. कंपनीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाला (MoRTH) याबद्दल माहिती दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा रिकॉल फेसलिफ्ट मॉडेलसाठी नाही तर जुन्या मॉडेलसाठी आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *