बॉस्को डिसोझा यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान
मुंबई, दि २७: व्यसन उपचार व प्रतिबंध क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय कार्य करणारे
बॉस्को मायकल डिसोझा यांना शासनाचा ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार २०२४-२०२५’ सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये गुरुवारी झालेल्या समारंभात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,प्रधान सचिव हर्षदीप कांबळे,सत्यपाल महाराज आदिंची भाषणे झाली.
डिसोझा यांनी गेल्या ३३ वर्षांहून अधिक काळ व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करत हजारो व्यसनाधीन व्यक्तींना नवे जीवन दिले आहे. पुनर्वसन, जनजागृती, प्रशिक्षण आणि संशोधन या सर्व स्तरांवर त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, देशभरात व्यसनमुक्ती केंद्रे उभारण्यामध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पोलीस, विद्यार्थी, तसेच विविध सामाजिक घटकांमध्ये ते नियमितपणे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहेत.
या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया देताना बॉस्को मायकल डिसोझा यांनी ‘नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य’च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास आणि चिटणीस अमोल स.भा. मडामे यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या सहकार्यामुळे व्यसनमुक्ती चळवळ अधिक प्रभावीपणे राबवता आली. यापुढे देखील मी माझे काम आहे सुरू ठेवणार आणि जे व्यसनमुक्तीसाठी मी प्रयत्न करत आलो आहे तो यापुढेही चुरढवून व्यसनाधीन झालेल्या तरुणांना आणि लोकांना व्यसनापासून मुक्त करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला .या प्रसंगी त्यांच्या पत्नी चामिॅन बास्को डिसूझा,नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस अमोल स.भा.मडामे उपस्थित होते.JS/ML/MS