चर्नी रोड स्थानकाबाहेरील सामानामुळे पादचारी हैराण

 चर्नी रोड स्थानकाबाहेरील सामानामुळे पादचारी हैराण

मुंबई, दि २७
चरणी रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला प्रवेशद्वाराच्या बाहेर मोठ्या प्रमाणात सामान ठेवलेले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना या ठिकाणी वजा करणे फार त्रासदायक झालेले आहे. चरणी रोड रेल्वे स्थानक हे पश्चिम रेल्वे वरील एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक ओळखले जाते. गिरगाव,ठाकूरद्वार काळबादेवी, खेतवाडी येथील रहिवाशांना या ठिकाणावरून चेन्नई रोड रेल्वे स्थानकावरूनच ये जा करावे लागते. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात रेल्वे प्रवाशांची गर्दी असते. तसेच चरणी रोड रेल्वे स्थानकाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात कॉलेज आणि महाविद्यालये असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची गर्दी असते परंतु हे रेल्वे स्थानक सध्या समस्यांचे माहेरघर झालेले आहे. या ठिकाणी येथे काम करणारे कंत्राट दाराने मोठ्या प्रमाणात पत्रे आणि लोखंडी सळ्या या पदपथावरच फेकून दिलेले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रोड वरून चालावे लागत असून रस्ता ओलांडणे देखील फार मुश्किल झालेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघातात वाढ होत आहे. तरी या पदपथावरील सर्व सामान त्वरित काढून हे पदपथ प्रवाशांसाठी मोकळे करावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी, पादचारी, विद्यार्थी आणि दुकानदार करत आहेत. या समस्येबाबत आम्ही वारंवार स्थानिक नगरसेविका स्नेहल तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून या समस्येबाबत कोणतेही ठोस उपाययोजना आणि कार्यवाही झालेली दिसली नाही. त्यामुळे हा त्रास अजूनही सुरू आहे अशी माहिती स्थानिक लोकांनी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिली. KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *