स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या वतीने बहारदार गीतांचा कार्यक्रम
मुंबई, दि २७
स्थानीय लोकाधिकार सेना महासंघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता साहित्य संघ मंदिर,गिरगाव, मुंबई येथे मराठी भाषा दिवसा निमित्त तथ्य संगीतकार श्रीनिवास काळे यांच्या गीतांचा बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मराठी भाषा दिनाचे अध्यक्ष उदय सामंत, महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, कार्याध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात साहित्यिक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित राहणार आहेत. तरी आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे सरचिटणीस माजी खासदार राहुल शेवाळे आणि महासंघाचे सरचिटणीस अरुण मोरे यांनी केले आहे.KK/ML/MS