दोन पेक्षा जास्त मुलं असली तरीही या राज्यात लढता येणार निवडणूक
जयपूर, दि. २५ :
राजस्थान सरकारने आपल्या निवडणूक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘राजस्थान पंचायती राज अधिनियम 2026’ आणि ‘राजस्थान नगरपालिका अधिनियम 2026’ ला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या नियमांनुसार, आता दोनपेक्षा जास्त मुले असणाऱ्या व्यक्तींनाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवता येणार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी असलेली दोन मुलांची सक्ती आता संपुष्टात आली आहे. निवडणूक सुधारणेनुसार दोनपेक्षा जास्त मुले असलेले नागरिक आता पंचायत आणि नगरपालिका निवडणूक लढवू शकतील. त्याबाबतचा निर्णय राजस्थान सरकारने घेतला आहे.
SL/ML/SL