ईडीकडून अनिल अंबानींच्या घरावर जप्ती

 ईडीकडून अनिल अंबानींच्या घरावर जप्ती

मुंबई, दि. २५ : उद्योजक अनिल अंबानी यांच्या मुंबईतील ‘Abode’ निवासस्थानावर ईडीकडून तात्पुरती जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेल्या या घराची किंमत अंदाजे 3,716 कोटी रुपये एवढी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे.

अनिल अंबानी यांच्या ज्या निवासस्थानावर ईडीकडून कारवाई करण्यात आली ती आलिशान इमारत मुंबईतील पाली हिल परिसरामध्ये आहे.‘Abode’ असं या इमारतीचं नाव असून, ही एकूण 17 मजल्यांची इमारत आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत अनिल अंबानी आणि त्याच्या उद्योग समूहातील कंपन्यांविरोधात आतापर्यंत एकूण जप्तीची कारवाई 15000 कोटींपेक्षा जास्तीची आहे. दरम्यान ही कारवाई जरी ईडीकडून तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आली असली तरी देखील यामुळे आता अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *