क्रिकेट हंगामामुळे महानगरांशिवाय इतर शहरांमध्ये पर्यटनाला चालना
मुंबई, दि २५
रांची, तिरुवनंतपुरम आणि अहमदाबादसारख्या क्रिकेट स्पर्धा आयोजक शहरांच्या शोधात मागील काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे आगामी क्रिकेट स्पर्धांमुळे निवासाच्या शोधात रस वाढल्याचे दिसून येते.
भारत, XX फेब्रुवारी २०२६: भारतातील आगामी क्रिकेट हंगामात देशांतर्गत प्रवासात लक्षणीय वाढ होत आहे. नवीन एअरबीएनबी माहितीनुसार मागील काही वर्षांत सामन्यांचे आयोजक असलेल्या विशेषतः महानगरांपलीकडील शहरांमध्ये मागणीनुसार शोध आणि बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते आहे.
मागणी महानगरांपलीकडे वाढते आहे
एप्रिल आणि मे या कालावधीत महत्त्वाच्या स्पर्धांना सुरूवात होत असताना प्रवासासाठी मुक्कामाच्या ठिकाणांची मागणी रांची, तिरुवनंतपुरम, जयपूर आणि लखनऊ अशा उदयोन्मुख क्रिकेट केंद्रांमध्ये वाढू लागली आहे. त्यातून खेळाचे प्रमुख क्षण भारताच्या पर्यटन नकाशात कशा रितीने बदल घडवतात हे दिसते.
एअरबीएबीच्या अंतर्गत माहितीनुसार क्रिकेट हंगामात अनेक क्रिकेट सामन्यांच्या आयोजक शहरांसाठी भारतीय प्रवाशांनी केलेल्या शोधांत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. महानगरांपलीकडे जाऊन उदयोन्मुख क्रिकेट केंद्रांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसले आहे.
• रांचीमध्ये मागील काही वर्षांत निवासासाठी सुमारे १२०% पेक्षा जास्त शोध घेतला गेला आहे.
• तिरुवनंतपुरममध्ये मागील काही वर्षांत निवासासाठी सुमारे ११०% पेक्षा जास्त शोध घेतला गेला आहे.
• जयपूर आणि लखनौमध्ये मागील काही वर्षांत निवासासाठी अनुक्रमे सुमारे ७०% आणि ६०% पेक्षा जास्त शोध घेतला गेला आहे.
या माहितीतून असे दिसते की अत्यंत महत्त्वाचे सामने टियर २ शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाऊ लागले आहेत. त्यातून भारताच्या पारंपरिक महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत पाहुण्यांच्या मागणीतील भौगोलिक वितरण व्यापक होऊ लागले आहे.
महत्त्वाच्या सामन्यांच्या दिवशी मागणीत मोठी वाढ झाली
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या सप्ताहात (१४-१७ फेब्रुवारी २०२६) यजमान शहर कोलंबोमध्ये भारतीयांनी मुक्कामासाठी केलेल्या शोधांमध्ये ३२५% पेक्षा जास्त वाढ झाली, तर रात्रीसाठी जागा बुक केल्या गेल्याने वार्षिक स्तरात मोठी वाढ झाली. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यादरम्यान देशाबाहेर प्रवास करायला लावण्यातील क्रिकेटची शक्ती अधोरेखित झाली.
तसेच, क्रिकेट विश्वचषक शेवटच्या टप्प्यापूर्वी (७-१० मार्च २०२६) अहमदाबादमधील शोधांमध्ये जवळजवळ १७०% वाढ झाल्याचे दिसले. त्यामुळे महत्त्वाच्या सामन्यांदरम्यान महत्त्वाचे क्रिकेट स्थान म्हणून या शहराचे स्थान मजबूत झाले.
मॅच डे = पर्यटनस्थळ
या वाढीत क्रिकेटमुळे मोठा बदल झाला आहे. एकेकाळी घराच्या दिवाणखान्यात बसून सामना बघितला जात होता. आता विशेषतः तरुण भारतीयांमध्ये प्रत्यक्ष जीवनाच्या प्रवासात तो रूपांतरित झाला आहे. सलग सामने पाहण्यापासून ते आवडत्या संघांना पाठिंबा देण्यासाठी इतर राज्यांमध्ये प्रवास करण्यापर्यंत क्रिकेट जेन झी प्रवास आणि पर्यटनस्थळ कशा प्रकारे ठरवते याला मोठे प्रोत्साहन देत आहे.
एअरबीएनबीच्या अनुभवावर आधारित पर्यटन माहितीसंदर्भातील सर्वेक्षणात असे दिसून आले की भारतातील सुमारे ६० % जेन झीच्या मते ते २०२६ मध्ये थेट क्रिकेट सामन्यांना उपस्थित राहण्यासाठी प्रवास करण्याची योजना आखत आहेत आणि ७०% मित्र किंवा कुटुंबासह उपस्थित राहणे पसंत करतात. क्रिकेट भारताच्या जेन झीला विशिष्ट शहराकडे आकर्षित करत असले तरी, त्यांचा प्रवास सामान्यतः सामन्याच्या दिवसापलीकडे विस्तारला जातो. छोट्या, एकमेव उद्देशाच्या भेटींसोबतच हे प्रवास पर्यटनासाठीही आयोजित केले जातात. सुमारे निम्मे पर्यटक (५३%) स्थानिक संस्कृती, पाककृती आणि स्थानिक लोकांचा अनुभव घेण्यासाठी सामन्याच्या दिवसांसोबत इतर दिवसांसाठी सहलींचे नियोजन करतात. क्रिकेट सामन्यासाठी सामान्यतः ३-४ दिवस प्रवास केला जातो. त्यातून संस्कृती समजून घेणे आणि अनुभव घेणे महत्त्वाचे मानले जाते असे दिसते.
जागेचा शोध घेण्याच्या पद्धतीत हा बदल प्रतिबिंबित होतो. क्रिकेट सीझननुसार बदलणाऱ्या भारतीय प्रवाशांच्या एअरबीएनबी शोध व बुकिंगच्या आकडेवारीवरून असे दिसते की क्रिकेटचा प्रवास हा अधिकाधिक ग्रुप आणि कुटुंब-स्नेही अनुभव बनत चालला आहेः
• अहमदाबादमध्ये संपूर्ण घरांचा शोध खासगी खोल्यांच्या शोधापेक्षा जवळजवळ दुप्पट होता.
• याशिवाय अहमदाबाद (जवळपास ५०% वाढ), कांगडा (जवळपास ९०% वाढ) आणि विशाखापट्टणम (७५% वाढ) अशा शहरांमध्ये दोन किंवा अधिक बेडरूम असलेल्या घरांच्या शोधात वाढ झाली आहे.
एअरबीएनबीचे भारत आणि आग्नेय आशियाचे राष्ट्रीय प्रमुख अमनप्रीत सिंग बजाज म्हणाले, “क्रिकेट हा मागील अनेक वर्षांपासून देशातील जनतेचा आत्मा ठरला आहे. आता हीच ऊर्जा प्रवासामध्ये रूपांतरित होत असल्याचे दिसते आहे. त्यात चाहते खेळाभोवती अर्थपूर्ण प्रवासाचे नियोजन करतात. हे क्षण फक्त स्टेडियमपुरते मर्यादित राहत नाहीत. लोक निवासाचा कालावधी वाढवतात, मित्र आणि कुटुंबासह प्रवास करतात आणि जात असलेल्या ठिकाणाचा अत्यंत सखोल अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात. एअरबीएनबीवर आम्ही हा बदल प्रत्यक्ष पाहत आहोत, कारण प्रवासी अशी घरे निवडतात जिथे त्यांना एकत्र राहता येते, परिसराचा अधिक प्रामाणिकपणे अनुभव घेता येतो आणि सामन्याचे दिवस पूर्ण, अविस्मरणीय सहलींचा अनुभव ठरतात. संस्कृतीमुळे प्रवासाला कशा प्रकारे नवीन आयाम मिळतो आणि स्थानिक समाजासाठी अर्थपूर्ण प्रभाव कसा निर्माण होतो याचे हे एक शक्तिशाली उदाहरण आहे.”
भारताची पर्यटन परिसंस्था जसजशी विकसित होत आहे, तसतसे क्रिकेटचा प्रवास पारंपरिक शहरांच्या पलीकडे विस्तारित होत आहे. चाहते महत्त्वाच्या सामन्यांसाठी प्रवास करत असताना आणि सामन्याच्या सप्ताहाशेवटी मुक्कामाचे नियोजन करत असताना त्याचा फायदा स्थानिक हॉटेल आणि इतर वातावरणाला मदत करणाऱ्या यजमान शहरांपर्यंत पोहोचत आहे आणि भौगोलिकदृष्ट्या व्यापक पर्यटनाच्या मागणीत योगदान देत आहे.KK/ML/MS