केरळ राज्याचे नाव आता बदलणार
थिरुवनंतपुरम, दि. २४ : केरळ राज्याचे नाव आता लवकरच बदलणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून केरळ राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाने, आज ‘केरळ’ या राज्याच्या नावात बदल करून ते ‘केरलम ’ असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती ‘केरळ (आल्टेरेशन ऑफ नेम ) बिल , 2026’ हे विधेयक भारतीय संविधानाच्या कलम 3 अंतर्गत राज्य विधानसभेचे मत जाणून घेण्यासाठी केरळ राज्य विधानसभेकडे पाठवतील.
राज्य विधानसभेकडून मत प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार पुढील कार्यवाही करेल आणि राष्ट्रपतींची शिफारस घेऊन ‘केरळ’ या राज्याचे नाव ‘केरलम’ असे बदलण्यासाठी ‘केरळ (आल्टेरेशन ऑफ नेम) बिल , 2026’ हे विधेयक संसदेत सादर केले जाईल. दरम्यान, केरळ अधिवेशन ने 24 जून 2024 रोजी ‘केरळ’ या राज्याचे नाव ‘केरलम’ असे करण्याचा ठराव मंजूर केला होता.
केरळ अधिवेशन ने 24 जून 2024 रोजी ‘केरळ’ या राज्याचे नाव ‘केरलम’ असे करण्याचा ठराव मंजूर केला होता. या ठरावात म्हटले आहे की आपल्या राज्याचे नाव मल्यालम भाषेत ‘केरलम’ असे आहे.