बीड जिल्ह्यातील विविध पतपेढीमधील ठेवीदारांच्या ठेवी परत करा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार
सचिन उबाळे पाटील यांची मागणी
मुंबई, दि २४
बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, साईराम अर्थ को. ऑपरेटीव्या सोसायटी, राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, माँसाहेब जिजाऊ मल्टीस्टर धीर को. ऑपरेटीव्ह सोसायटी, शुभ कल्याण मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑपरेटीव्ह सोसायटी, छत्रपती मल्टीस्टेर केहीर को. ऑपोटीव्ह सोसायटी या सर्व बहुराजीय (मल्टीस्टेट) को. ऑपरेटीव्ह सोसायटी, मराठवाडा अर्बन माजलगांव, लक्ष्मीमाता अर्थन या संस्थेतील ठेवी तात्काळपणे ठेवीदारांना परत करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी ठेवीदार संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष सचिन उबाळे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन केले. या मागणीसाठी त्यांनी आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन सुरू केले असून आंध्रा मध्ये मोठ्या प्रमाणात ठेवीदार महिला आणि पुरुष यांनी उपस्थिती दर्शवली. बीड जिल्ह्यातील विविध ठेवीदारांच्या मागण्या
सर्व मल्टीस्टेटच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांचे सहकारी संचालक मंडळातील सदस्य तसेच कर्मचारी पांच्या नावे असलेल्या स्थावर मालत्ता तात्काळ जप्त करण्यात याव्यात. तसेच यापुर्वी ज्या ज्या संस्थेच्या अध्यक्ष, संचालकांच्या कर्मचाऱ्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त केलेल्या आहेत त्यांच्या लिलावाची तारीख तात्काळ जाहिर करा. व सर्व वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिध्द करा.
तसेच सुरेश ज्ञानोबा कुटे यांचे तिरुमला उद्योग समुह (कुटे ग्रुप) व सुरेश ज्ञानोचा कुटे यांचा मुलगा आर्यन सुरेश कुटे याने स्थापन
केामेली इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी अंतर्गत (गेम कंपनी) तसेच आर्चना सुरेश कुटे यांच्या नावाने विविध असलेल्या कंपन्या यांना कर्ज देणाऱ्या सर्व राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका व नागणी सहकारी बँका, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक व इतर बँका यांनी दिलेल्या बेकायदेशीर कर्जाची सखोल चौकशी करुन त्यांच्या विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे संचालक व नातेवाईक यांच्या नावे असलेली मालमत्ता जप्त करा.
तसेच सुरेश कुटे (कुटे ग्रुप) यांच्या तिसगाव डेअरी जि. अहिल्यानगर, फलटण डेअरी जि. सातारा, बीड येथील तिरुमाला उद्योग समुह
(कुटे ग्रुप) यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करा.
त्याचप्रमाणे ज्ञानराधासह वरीन सर्व मल्टीस्टेटचे फॉरेन्सिक ऑडीट तात्काळ करा.
तसेच इडीने जप्त केलेल्या मालमत्रेचा समावेश एम.पी.आर.डी. कायद्या अंतर्गत जप्त केलेल्या संपत्तीमध्ये करावा. ईडीने निश्चित केलेल्या आरोपीची सर्व संपत्ती जमत करावी अशा विविध मागण्या या ठिकाणी करण्यात आल्या. जोपर्यंत आमच्या या मान्य मान्य होत नाही तसेच आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे प्रिय आंदोलन असेच सुरू राहील अशी माहिती ठेवीदार संघर्ष कृती समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सचिन उबाळे पाटील यांनी दिली.KK/ML/MS