बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज सादरीकरण
मुंबई, दि २४
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सन २०२६-२७ चे अर्थसंकल्पीय अंदाज बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर करण्यात येणार आहेत.*
प्रारंभी, माननीय अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे हे शिक्षण खात्याचे अर्थसंकल्पीय अंदाज माननीय शिक्षण समितीस बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिक्षण समिती सभागृह, दुसरा मजला, मुख्य इमारत, महानगरपालिका मुख्यालय येथे सादर करतील.
त्यानंतर मा. महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाज माननीय स्थायी समितीस बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता स्थायी समिती सभागृह, पहिला मजला, मुख्य इमारत, महानगरपालिका मुख्यालय येथे सादर करतील.
तसेच मा. महानगरपालिका आयुक्त श्री. भूषण गगराणी हे सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजांबाबत प्रसारमाध्यमांशी बुधवार, दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता महानगरपालिका आयुक्त सभागृह, दुसरा मजला, मुख्य इमारत, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१ येथे संवाद साधणार असल्याची माहिती
तानाजी कांबळे
जनसंपर्क अधिकारी यांनी दिली.KK/ML/MS