कोळसा खाणीत भीषण स्फोट, 16 मजूरांचा मृत्यू

 कोळसा खाणीत भीषण स्फोट, 16 मजूरांचा मृत्यू

शिलाँग,दि. ५ : मेघालयच्या पूर्व जैंतिया हिल्स जिल्ह्यात गुरुवारी एका ‘अवैध’ कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात किमान १६ मजूर ठार झाले असून, इतर अनेक जण अडकल्याची भीती आहे, असे पोलीस महासंचालक आय नोंगरांग यांनी सांगितले. बचाव पथके शोधकार्य करत आहेत, असे त्यांनी सांगितले. ही घटना सकाळी थांगस्कू परिसरात घडली, असेही त्यांनी नमूद केले. या स्फोटामुळे मजुरांची सुरक्षा आणि खाणीत अवैधपणे चालणाऱ्या कामांचा विषय ऐरणीवर आला आहे.

खाणीत स्फोट झाल्यानंतर प्रशासनानं आसपासच्या परिसराची सुरक्षा वाढवली आहे. बचाव कार्यात अडचणी येऊ नयेत म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. स्फोटाचं कारण शोधण्यासाठी तपास सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. खाणीत वायू गळती किंवा तांत्रिक त्रुटीमुळे स्फोट झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता आहे. संपूर्ण तपास झाल्यावरच स्फोटामागील नेमकं कारण समजू शकेल.

मेघालयातील अनेक भागांमध्ये रॅट होल मायनिंग चालतं. अनेक ठिकाणी अरुंद आणि धोकादायक बोगदे खणले जातात. यावर राष्ट्रीय हरित लवादानं बंदी घातलेली आहे. मात्र तरीही अनेक भागांमध्ये धोकादायक पद्धतीनं खाणकाम केलं जातं. त्यामुळे बऱ्याचदा दुर्घटना घडतात. त्यात मजुरांचे नाहक बळी जातात.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *