चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

 चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे वार्षिक स्नेहसंमेलन

मुंबई, दि. ५ : चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली यांचे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वार्षिक स्नेहसंमेलन रविवार, दिनांक 8 फेब्रुवारी, 2026 रोजी ज्येष्ठालय सभागृह, बाभई, बोरीवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आले आहे.

या संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात वित्तीय गुंतवणूकविषयक व्याख्यान तसेच ज्ञातीतील कलाकारांचा ‘गीतों का कारवाँ ‘ हा सुमधुर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. विशेष गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्ञातीतील ज्येष्ठ बंधु-भगिनींचा सत्कार आणि कला – क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविलेल्या व्यक्तींचा सत्कार अशी या सर्वसमावेशक कार्यक्रमाची रूपरेषा आहे.

वधू – वर सूचक मंडळांतर्गत नावनोंदणी तसेच संस्थेच्या नवीन सभासदांची नोंदणी याप्रसंगी करण्यात येणार आहे. या स्नेहसंमेलनास सर्व ज्ञाती बंधु – भगिनींनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज, बोरीवली या संस्थेचे कार्यवाह उदय मथुरे, (9821099605) यांनी केले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *