शरद पवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला
बारामती, दि. ४ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर दोन दिवसांतच वेगवान राजकीय घडामोडी घडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्याला या शपथविधी बाबत काहीही कल्पना नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यभर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. अखेर आज शरद पवार यांनी बारामती येथील सहयोग सोसायटीमध्ये जाऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि सुनबाई सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली. या भेटीतून कोणता निर्णय घेतला जातो याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहीले आहे.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ही पहिलीच भेट आहे, तसेच सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोरदार चर्चा देखी सुरू आहे, या सर्व पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान या भेटीवेळी शरद पवारांसह पूर्ण पवार कुटुंबातील सदस्य देखील उपस्थित होते, फक्त यावेळी सुप्रिया सुळे या उपस्थित नव्हत्या. शरद पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार पार्थ पवार, जय पवार, श्रीनिवास पवार, राजेंद्र पवार, यांच्यासह पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी आले होते.
सहयोग निवासस्थानी यावेळी पवार कुटुंबामध्ये अर्धातास चर्चा झाली, या भेटीनंतर शरद पवार सहयोग सोसायटीमधून बाहेर पडून, गोविंदबागेकडे रवाना झाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांची ही अजित पवार यांच्या निधनानंतर आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलीच भेट होती, दरम्यान या भेटीपूर्वी दुपारी शरद पवार यांची पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत भेट झाली होती. या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
SL/ML/SL