युमनाम खेमचंद सिंह झाले मणिपूरचे 13 वे मुख्यमंत्री
इंफाळ, दि. ४ : मणिपूरमधील ३५६ दिवसांपासून लागू असलेली राष्ट्रपती अखेर आज संपुष्टात आली आहे, भाजप नेते युमनाम खेमचंद सिंह मणिपूरचे १३ वे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी आज संध्याकाळी लोकभवन येथे खेमचंद यांना गोपनीयतेची शपथ दिली. मैतेई समुदायाचे असलेले खेमचंद हे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचे जवळचे मानले जातात. नागा आमदार लोधी दिखो यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ते नागा पीपल्स फ्रंटचे सदस्य आहेत. कुकी समुदायाच्या सदस्या नेमचा किपगेन यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
त्यांनी दिल्लीतील मणिपूर भवन येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन झाले आहे. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर दीर्घकाळ राष्ट्रपती राजवट लागू होती.
SL/ML/SL