ऊस दराच्या प्रश्नी वाहतूक करणारे 50 ट्रॅक्टर अडवले

सांगली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील वर्षी गाळप झालेल्या ऊसाचा ४०० रुपयाचा हप्ता द्यावा आणि यंदाच्या हंगामात ३५०० रुपये पहिली उचल द्यावी या मागणी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. सांगली जिल्ह्यात ऊस दराचे आंदोलन तीव्र करण्यात आले असून, वाळवा तालुक्यात ऊस वाहतूक करणारे 50 ट्रॅक्टर अडवून धरण्यात आले आहेत.
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना आणि हुतात्मा किसन अहीर सहकारी साखर कारखान्याकडे जाणारे उसाचे ट्रॅक्टर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बावची फाटा येथे थांबवून ठेवले आहेत.
शेतकऱ्यांना उसाचा योग्य दर न देणाऱ्या कारखान्याच्या निषेधार्थ शुक्रवार १० नोव्हेंबर रोजी साखर कारखान्याच्या अध्यक्षाच्या बंगल्यासमोर खर्डा भाकर आंदोलन करण्यात येणार आहे. 50 tractors transporting sugarcane were stopped due to question of sugarcane price
ML/KA/PGB
9 Nov 2023