सांगली बाजार समितीत ५० टन नवीन बेदाणा

 सांगली बाजार समितीत ५० टन नवीन बेदाणा

सांगली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली बाजार समितीत झालेल्या बेदाणा सौद्यात तब्बल ११ दुकानांत ५० टन नवीन बेदाण्याची आवक झाली. या वेळी झालेल्या सौद्यात १६० ते २७१ रुपये प्रति किलोस दर मिळाला.

गेल्या महिन्यापासून द्राक्ष हंगामाला सुरवात झाली. नवीन बेदाण्याचा हंगामही सुरू झाला असून बाजारात विक्रीसाठी येत आहे. सांगली बाजार समिती आवारातील बेदाणा सौदा हॉलमध्ये नवीन मालाच्या सौद्याला प्रारंभ करण्यात आला. चांगल्या बेदाण्यास १६० ते २७१, मध्यम मालास ११० ते १७०, काळ्या बेदाण्यास ३० ते ६० रुपये दर मिळाला.

यंदाच्या हंमागात हवामानाचा परिणाम झाल्याने बेदाणा सौद्याचा प्रारंभ बाजार समितीत झाला.

ML/KA/SL

9 Feb. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *