५० लाख लोकांनी केले या वित्तीय कंपनीचे App डाऊनलोड

 ५० लाख लोकांनी केले या वित्तीय कंपनीचे App डाऊनलोड

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील बहुतांश नागरिक आता डिजिटल बँकींग व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. नॉन बँकिंग वित्तीय कंपनी, एल अँड टी फायनान्स (एलटीएफ) चे प्लॅनेट (पर्सनलाइझ्ड लेंडिंग अँड असिस्टेड नेटवर्क्स )हे ऍप्लिकेशनने ५० लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे एकूण २३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वित्तीय व्यवसाय आणि ४४० कोटी रुपयांपेक्षा अधिक संकलन साध्य झाले आहे.तसेच देशभरातून ७५ लाखांहून अधिक व्यवहार प्लॅनेट ऍपने केले आहेत. विशेष म्हणजे यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीणतही पूर्णपणे डिजिटल माध्यमातून वित्तीय वितरण जाळे यशस्वी केले आहे.प्लॅनेट ऍप हे गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल ऍप स्टोअरवरील ४.३ गुणांसह सर्वोच्च-श्रेणी प्राप्त केलेले वित्तीय ऍप्सपैकी एक आहे. या ऍपच्या यशाचे श्रेय त्याचा साधेपणा, सर्वसमावेशक वैशिष्ट्ये आणि ग्राहकांच्या समाधानाची बांधिलकी यांना दिला जाऊ शकते.

मार्च २०२२ पासून सुरू झालेले प्लॅनेट ऍप हे प्रामुख्याने ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना विविधांगी वित्तीय उत्पादने आणि सेवा अतिशय सहजरित्या सुरक्षित आणि सहजरित्या उपलब्ध होतील, यासाठी तयार करण्यात आलेले आहे. विस्तृत आणि मोठी फिनेटक कंपनी (‘फिनटेक अॅट स्केल”) बनण्यासाठी वचनबद्ध असलेल्या एलटीएफने आपल्या विस्तृत संख्येतील ग्राहकांना सर्वोत्तम पर्याय दिलेले आहेत.अलीकडेच ऍपवर थेट उपलब्ध झालेला ग्रामीण गट कर्ज आणि मायक्रो फायनान्स व्यवसायाने सुमारे ६००० हून अधिक ग्राहक निर्माण केले असून, त्यापैकी ४५०० हून अधिक ग्राहक हे अगदी अलीकडच्या काळातील आहेत.

ऍपने ग्राहकसंख्येत ओलांडलेल्या महत्वाच्या टप्प्याबद्दल आनंद व्यक्त करताना एल अँड टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ दिनानाथ दुभाषी म्हणाले, “ प्लॅनेट ऍपला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या चमूच्या कठोर परिश्रम आणि समर्पणाचा उत्तम पुरावा आहे. आमच्या ग्राहकांना त्यांच्या घरातूनच अतिशय आरामात वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन करण्यास आमचे ऍप करत असलेली मदत पाहून आम्हाला अतिशय आनंद होत आहे. महत्वाचे म्हणजे आमच्या ग्राहकवर्गातील पाच लाखांहून अधिक ग्रामीण महिला आणि ९५ हजारांहून अधिक शेतकरी त्यांच्या सेवांच्या गरजा डिजिटल पद्धतीने पूर्ण करण्यासाठी या ऍपचा वापर करत आहेत.

SL/KA/SL

12 Sept. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *