१४ वर्षाच्या अनुष्काने तयार केले सोशल मीडिया अवेअरनेस ॲप

यवतमाळ, दि. ११ (आनंद कसंबे ) : यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथील अनुष्का संतोष बदुकले,
शांतिनिकेतन विद्यालयात नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. जेमतेम 14 वर्षे वय असलेल्या अनुष्का हिने प्रथमच सोशल मीडियाच्या वापराबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने सोशल मीडिया अवेअरनेस ॲप तयार केले आहे.
आज प्ले स्टोअर ला अनेक ॲप आणि गेम असतात ज्याद्वारे मनोरंजन होते . माहितीही मिळते,परंतु विरुद्ध परिणाम करणारे स्कॅम सुद्धा होतात. स्कॅमबाबत लहान मुलांना विशेषतः किशोरवयीन मुला-मुलींना माहिती नसते मग इतर परिणाम भोगावे लागतात . म्हणून याची एकत्रीत माहिती या सोशल मीडिया अवेअरनेस ॲप मध्ये दिलेली आहे.
लहान मुलांसोबत ज्यांना माहिती नाही अशी मोठी मंडळी सुद्धा या ॲपचा उपयोग करू शकतात. सोशल मीडिया बद्दल सामाजिक जनजागृती व्हावी या उद्देशाने अनुष्काने मोबाईलचा चुकीचा वापर होवू नये , शाळकरी मुलांसोबत तरुणांमध्ये जागृती व्हावी म्हणून समाज माध्यमाच्या वापर कसा करावा याची माहिती देणारे ॲप अनुष्काने तयार केले आहे.
विविध उपक्रमात सहभाग घेवून अनुष्काने 200 पेक्षा जास्त सर्टिफिकेट प्राप्त केले आहेत. त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या मिशनद्वारे आतापर्यंत 10 रेकॉर्ड झाले आहेत. दहा रेकॉर्ड असलेली ती यवतमाळ जिल्ह्यातील ही एकमेव विद्यार्थिनी आहे. नुकतेच तिने गार्बेज डिटेक्टर सॉफ्टवेअर सुद्धा तयार केले आहे .ज्याद्वारे कचरा कॅमेरा समोर पकडल्यावर तो ओला आहे की सुका आहे हे कळते. अनुष्काचे याबाबत सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ML/KA/SL
11 Aug 2023