mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

घाटकोपर होर्डिंग् दुर्घटना प्रकरणात होर्डिंग कंपनी आणि रेल्वे वर गुन्हा

मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत आज अचानक आलेल्या जोरदार वादळी वारे आणि तुफानी पावसामुळे घाटकोपर भागात रेल्वेच्या हद्दीत लावलेले एक अनधिकृत होर्डींग कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्याखाली ऐशी वाहने आणि त्यातील सुमारे दीडशे व्यक्ती अडकल्या आहेत, याप्रकरणी संबधित होर्डींग कंपनी आणि रेल्वे वर मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमध्ये […]Read More

विदर्भ

पोलीस – नक्षल चकमकीत तीन नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा हस्तगत ….

गडचिरोली दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेरमिली नक्षल दलमचे काही सदस्य भामरागड तालुक्यातील कटरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात सध्या सुरू असलेल्या TCOC कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने तळ ठोकून असल्याची विश्वसनीय सूत्राकडून गडचिरोली पोलीस दलास प्राप्त होताच सी 60 च्या दोन तुकड्याच्या सहाय्याने जंगल परिसरात शोध मोहीम राबवीत असताना आधीच दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी c60 […]Read More

ट्रेण्डिंग

मकरंद अनासपूरे, सयाजी शिंदे यांचा ‘रंगीत’ ओटीटीवर प्रदर्शित

मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) : आयुष्य जेव्हा रंगीत असतं, तेव्हा प्रेमात आलेला विरह म्हणजे अपघाताने कॅनवासवर पडलेला काळा रंग. अशा या विरहामागे एक रहस्यमय घटना असेल तर? एक रहस्यमय आणि रंगहीन घटना ‘रंगीत’ या चित्रपटात दडून बसली आहे, जी प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी आहे. ‘रंगीत’ १७ मे रोजी थेट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर […]Read More

राजकीय

महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कारवाई करा

मुंबई, दि. १३ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. याच प्रज्वल रेवन्नांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली आहेत. रेवन्नाचा भांडाफोड होताच त्याला भारतातून परदेशी पळून जाऊ दिले. महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द […]Read More

ट्रेण्डिंग

बीडमध्ये संपूर्ण गावाचा मतदानावर बहिष्कार

बीड, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.ग्रामस्थांना शांत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. बीड जिल्हयातील केज तालुक्यातील कोरडेवाडी वस्तीत मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील रहिवाशांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. हा इशारा दोन दिवसांपूर्वी देण्यात आला होता. मतदानाच्या दिवशी मतदान होऊन चार तास उलटून […]Read More

Uncategorized

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी

मुंबई, दि.१३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सूरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे नंदुरबार – ६०.६० टक्केजळगाव – ५१.९८ टक्केरावेर – ५५.३६ टक्केजालना – ५८.८५ टक्केऔरंगाबाद – ५४.०२ टक्केमावळ […]Read More

ट्रेण्डिंग

पुण्यात साकारली युनिक मतदान केंद्रे

पुणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून शहरांमध्ये युनिक मतदान केंद्र सुद्धा आहे तयार करण्यात आलेली आहे राज्य सरकारच्या सीओईपी या महाविद्यालयात युनिक मतदान केंद्र तयार करण्यात आले असून या केंद्राला ऐतिहासिक असं महत्त्व आहे या केंद्राच्या दरम्यान मतदारांना पुणे शहरातील ऐतिहासिक स्थळांची […]Read More

विज्ञान

भारतातही झाले नॉर्दर्न आणि सदर्न लाइट्सची अद्भूत रोषणाई दर्शन

लडाख, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दोन दिवसांत सौरस्फोटामुळे भूचुंबकीय वादळ तयार झाले आणि म्हणूनच अचानक जगाच्या अनेक भागांमध्ये आकाशात रंगांचs तरंग दिसू लागले. नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (NOAA) ने वादळाचे स्वरूप तीव्र असल्याचे म्हटले आणि पुढील दिवसांत आणखी वादळे ग्रहावर धडकू शकतात असेही सांगण्यात आले. दरम्यान या खगोलिय घटनेमुळे नॉर्दर्न लाइट्स […]Read More

देश विदेश

अफगाणिस्तानात पावसाचा धुमाकुळ, पुरामुळे ३०० लोकांच्या मृत्यू

काबूल, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून एक हजारांहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली आहेत, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या अन्न संस्थेने शनिवारी दिली. जागतिक अन्न कार्यक्रमाने म्हटले आहे की, गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानात मुसळधार पाऊस होत आहे. शेजारच्या तखार प्रांतात सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार […]Read More

आरोग्य

दक्षिणेतील या मंदिरांच्या पूजेत ऑलिंडरच्या फुलांच्या वापरावर बंदी

तिरुवनंतपूरम, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळमधील बहुतेक मंदिरांचे व्यवस्थापन करणाऱ्या दोन प्रमुख देवस्वोम मंडळांनी नुकतेच मंदिरांना प्रसादासाठी ऑलिंडरच्या फुलांचा वापर थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (टीडीबी) आणि मलबार देवस्वोम बोर्डाने या फुलांच्या विषारी स्वरूपाबद्दल चिंता लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फुलांमुळे मानव आणि प्राण्यांना इजा होऊ शकते, असे […]Read More