NCB कडून ‘जिहादी ड्रग’ चा साठा जप्त

 NCB कडून ‘जिहादी ड्रग’ चा साठा जप्त

नवी दिल्ली, दि. १६ : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या सहकार्याने “ऑपरेशन RAGEPILL” अंतर्गत देशातील पहिली मोठी कॅप्टॅगॉन ड्रग जप्ती केली. दिल्लीतील नेब सराय परिसरातून 31.5 किलो गोळ्या आणि गुजरातमधील मुंद्रा पोर्टवरून 196.2 किलो पावडर मिळून एकूण 227.7 किलो कॅप्टॅगॉन जप्त झाले. याची आंतरराष्ट्रीय किंमत सुमारे 182 कोटी रुपये आहे. या प्रकरणात एका सीरियन नागरिकाला अटक झाली असून, भारताला ट्रांझिट हब म्हणून वापरून खाडी देशांकडे खेप पाठवली जात असल्याचे उघड झाले.

जिहादी ड्रग’ का म्हटले जाते?
कॅप्टॅगॉन हे सिंथेटिक स्टिम्युलंट असून फेनेटाइलीन व अँफेटामाइनसारखे घटक यात असतात. मिडल ईस्टमधील संघर्षग्रस्त भागांत याचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो. काही दहशतवादी संघटनांनी युद्ध व हिंसक कारवायांमध्ये याचा वापर केल्याचे आरोप आहेत. यामुळे थकवा कमी होतो, आत्मविश्वास व आक्रमकता वाढते आणि व्यक्ती निर्भय बनते. म्हणूनच याला लोकप्रिय भाषेत ‘जिहादी ड्रग’ म्हटले जाते, मात्र ही संज्ञा वैज्ञानिक नाही.

कॅप्टॅगॉनमुळे झोप कमी होते, वेदना जाणवण्याची क्षमता घटते, ऊर्जा व आक्रमकता वाढते. दीर्घकाळ वापरामुळे हृदय, मेंदू व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. हे अत्यंत व्यसनाधीन करणारे औषध आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *