CIDCOच्या ताब्यातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार

 CIDCOच्या ताब्यातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार

नवी मुंबई, दि. १६ : नवी मुंबई : मध्य रेल्वे आणि CIDCO प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता सिडकोच्या अखत्यारीतील सर्व रेल्वे स्थानके येत्या ६ महिन्यांत मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या सर्व मागण्यांची दखल घेत पुढील ६ महिन्यांत हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण करण्याचे मान्य केले असून, पावसाळापूर्व आणि दैनंदिन देखभाल कामांबाबत येत्या आठवड्यात लेखी आदेश देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने मध्य रेल्वे आणि सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मुख्यालयात पार पडली. या बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांचाही सहभाग होता. या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन स्थानक हस्तांतरणाबाबत तत्त्वतः सहमती देण्यात आली. त्यानुसार येत्या ६ महिन्यांत सिडकोच्या अखत्यारीतील सर्व स्थानके अधिकृतपणे मध्य रेल्वेकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. तसेच पावसाळापूर्व तयारी आणि दैनंदिन देखभाल कामे मध्य रेल्वे प्रशासन करणार असल्याचेही मान्य करण्यात आले आहे.

नवी मुंबई परिसरातील अनेक स्थानकांची दुरवस्था, अपुऱ्या सुविधा आणि देखभाल करारांच्या मुदती संपल्यामुळे प्रवाशांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत होता. वाशी ते बेलापूर तसेच खारघर ते खांदेश्वर या मार्गांवरील देखभाल करार अनेक वर्षांपूर्वीच संपले असून, काही स्थानकांसाठी आजतागायत स्वतंत्र करारच करण्यात आले नव्हते.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *