mmcnews mmcnews

महानगर

ओबीसींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव

कल्याण, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नेहरूंच्या काळापासून २०१४ पर्यंत कॉंग्रेसकडून अफूची गोळी घेत गरीब..गरीब… अशी माळ जपली जात असून, गरीबांचा खेळ केला गेला. तर आता ओबीसींचे आरक्षण मुस्लिमांना देण्याचा घाट घातला असून, देशभरातील ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या आरक्षणाची लूट करण्याचा कॉंग्रेसचा डाव आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला. तसेच […]Read More

Featured

कुटुंब – समाजाचा मूलभूत एकक….

मुंबई, दि. 15 (जाई वैशंपायन) : व्यक्तीला जन्मानंतर मिळणारा पहिला समाज म्हणजे कुटुंब. व्याख्येनुसार पाहता- विवाहसंबंध, रक्तसंबंध, दत्तकत्वाने उत्पन्न संबंध- या बंधांनी एकत्र आलेला, बव्हंशी एका घरात राहणारा, आणि एकमेकांशी जोडीदार/पालक/अपत्य/भावंडे अशा नात्यांनी संवाद साधणारा व्यक्तिसमूह म्हणजे कुटुंब. परंतु त्यातील भावनिक, सामाजिक, शैक्षणिक असे असंख्य पैलू पाहता लक्षात येते की, कुटुंब ही अतिशय व्यापक संकल्पना […]Read More

Uncategorized

२६ मे पासून समुद्रामध्ये बोटींच्या वापरावर बंदी

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशाच्या आणि राज्याच्या विविध भागांत पूर्वमोसमी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. त्यातच काल IMD ने यावर्षी १९ मे रोजी म्हणजेच दरवर्षींपेक्षा एक आठवडा आधीच मान्सून अंदमानात दाखल होणार असल्याचे स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्हात धुळीच्या वादळासह पावसाने झोडपून काढले. […]Read More

देश विदेश

नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत १४ जणांना भारतीय नागरिकत्व प्रदान

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काही महिन्यांपूर्वीच देशात नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू झाला आहे. आज केंद्र सरकारने या कायद्यांतर्गत १४ लोकांना नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्यांतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्र जारी केले. गृह मंत्रालयाने नागरिकत्व (सुधारणा) कायद्यानुसार नागरिकत्व प्रमाणपत्रांची पहिला सेट जारी करण्यास सुरुवात केली.केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी आज नवी दिल्लीत सुरुवातीच्या १४ […]Read More

देश विदेश

सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवली न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक

नवी दिल्ली, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्यूज क्लिकचे संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना सर्वोच्च न्यायालायने मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. प्रबीर पुरकायस्थ यांच्यावर काही दिवसांपूर्वी युपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी युपीए अंतर्गत केलेल्या कारवाईला आव्हान देणारी […]Read More

देश विदेश

महादेव ॲप बेटिंग प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीसांकडून मोठी कारवाई

पुणे, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महादेव ॲप प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथे मोठी कारवाई केली आहे. एका इमारतीतून बेटिंग होत असल्याचे पुढे आले असून पोलिसांनी ७० ते ८० जणांना अटक केली आहे. भारतासह परदेशात महादेव बेटिंग ॲप प्रकरणी तपास सुरू आहे. या प्रकरणाची पाळेमुळे पुण्यातील नारायणगाव इथंपर्यंत पोहोचल्याचे पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे […]Read More

साहित्य

रामचरितमानस आणि पंचतंत्रचा समावेश आता जागतिक साहित्यकृतींमध्ये

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन (UNESCO) ने रामचरित मानस, पंचतंत्र आणि सह्रदयलोक-लोकन या ग्रंथांना जागतिक मान्यता दिली आहे. या साहित्यकृतींचा समावेश मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया-पॅसिफिक रिजनल रजिस्टर (MOWCAP) मध्ये करण्यात आला आहे. मेमरी ऑफ द वर्ल्ड (MoW) मध्ये जागतिक महत्त्व आणि सार्वत्रिक मूल्याच्या आधारावर आंतरराष्ट्रीय […]Read More

क्रीडा

ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी ठाणे हॉकी अकादमीचा पुढाकार

ठाणे, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे हॉकी अकादमीच्या उन्हाळी शिबिराची सुरुवात मोठ्या उत्साहात आणि उत्साहाने झाली, भारतीय हॉकीचे माजी प्रशिक्षक क्लेरेन्स लोबो आणि भारताच्या आशिया चषक प्रतिनिधी वैशाली पवार तसेच मध्य रेल्वेचे ॲथलेटिक प्रशिक्षक नागेश शेट्टी यांच्या यांच्या उपस्थित उद्घाटन संपन्न झाले. या शिबिरात एकूण ४७ खेळाडू सहभागी झाले होते, ते सर्वजण आपली […]Read More

पर्यावरण

१९ मे ला अंदमानात दाखल होणार मान्सून

पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या देशभरात विविध ठिकाणी जोरदार हजेरी लावणारा पूर्व मोसमी पाऊस आता लवकरच दीर्घकालिन वास्तव्यासाठी येणार आहे. दरवर्षी साधारण मे अखेरीस अंदमानात दाखल होणारा मान्सून यावर्षी एक आठवडा आधीच दाखल होणार आहे. मोसमी पावसाबाबत IMD ने ही महत्त्वाची माहिती दिली आहे. मोसमी पाऊस यंदा वेळेआधीच म्हणजे १९ मे रोजी […]Read More

देश विदेश

पृथ्वीपेक्षा ९ पट मोठ्या ‘महापृथ्वी’चा शोध

न्यूयॉर्क, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वाच्या अथांग पसाऱ्यात आपल्या पृथ्वीसारखा एखादा ग्रह सापडतो का, हे सातत्याने शोधणाऱ्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. अंतराळ शास्त्रज्ञांना पृथ्वीसारखा खडकांनी भरलेला,स्वतःचे वातावरण असलेला आणि जीवसृष्टी अनुकुल असलेल्या ग्रहाचा शोध लागला आहे. अंतराळ शास्त्रज्ञांनी या ग्रहाला 55 Cancri e or Janssen असे नाव दिले आहे. ते 8.8 […]Read More