mmcnews mmcnews

महानगर

Special 26 स्टाईल लुटमार करणारी टोळी मुंबई पोलिसांकडून जेरबंद

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अक्षय कुमार,अनुपम खेर, जिमी शेरगिल आणि किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला Special 26 हा चित्रपट तुम्ही पाहीला असेल. इन्कमटॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करत ही टोळी धनाढ्य लोकांकडे डाके टाकत शिताफीने पोबारा करत असल्याचे यात दाखवले आहे. या पद्धतीने लुटमार करणाऱ्या एका टोळीला आज मुंबई पोलीसांनी ताब्यात घेतले […]Read More

बिझनेस

भारतीय मसाल्यांची बदनामी थांबवण्याची राष्ट्रीय निर्यातदार संघटनांची मागणी

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ब्रँडेड मासाल्यामध्ये किटकनाशक अंश सापडल्याने सिंगापूर व हाँगकाँग या देशाने भारतातील एव्हरेस्ट व एम डी एच या मासाल्याबाबत नाराजी व्यक्त करत भारताला पत्रव्यवहार करत हे पदार्थ योग्य कसे ? असा सवाल केला आहे. यामुळे भारताची बदनामी झाली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्तरावरील चार मसाला निर्यातदार संघटनांनी केला असून या प्रकरणी […]Read More

ट्रेण्डिंग

घाटकोपर दुर्घटना प्रकरणी गुन्हा दाखल, व्हीजेटीआय देणार तपासणी अहवाल

मुंबई दि.16(एम एमसी न्यूज नेटवर्क) : छेडा नगर मधील जाहिरात फलक दुर्घटना प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ज्यांनी संरचना स्थिरतेबाबतचे प्रमाणपत्र दिले होते, त्यांच्याकडून महानगरपालिकेने स्पष्टीकरण मागवले आहे. त्याच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, छेडा नगर मधील जाहिरात फलकाविषयीचा तांत्रिक तपासणी अहवाल हा वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था (व्हीजेटीआय) यांचेकडून सादर […]Read More

मराठवाडा

महाप्रसादातून झाली विषबाधा, पन्नास जण रुग्णालयात

नांदेड, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 50 हून अधिक व्यक्तींवर नायगाव येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे आंबील महाप्रसादातून झालेल्या विषबाधेतून पन्नास हून अधिक लोकांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यानंतर नायगावचे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी या रुग्णांना दाखल करण्यात […]Read More

पर्यावरण

केरळमध्ये कधी दाखल होणार मोसमी वारे..?? हवामान विभागाने दिली माहिती!

पुणे, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोसमी पाऊस ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मोसमी वाऱ्याच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्यामुळे मोसमी पाऊस वेळेत केरळमध्ये दाखल होईल, असेही भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. सध्या उत्तर भारतात तापमान […]Read More

राजकीय

अजित पवार उद्यापासून प्रचारात होणार सहभागी

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अजित पवार नॉटरिचेबल असले की ते नाराज आहेत अशाच बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जातात. पण ते नॉटरिचेबलही नाही आणि नाराजही नाहीत. अजित पवार यांना निवडणुकीच्या कार्यकाळात घशाचे इन्फेक्शन झाले असल्याने डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगितले आहे. मात्र ते उद्यापासून प्रचारात सहभागी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील […]Read More

सांस्कृतिक

आषाढी यात्रेसाठी प्रशासनाची तयारी सुरू

सोलापूर, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यंदा आषाढीला १६ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज असून आरोग्य संपन्न वारीसाठी प्रशासनाचे मायक्रोप्लॅनिंग सुरू झाले आहे.यासाठी आषाढी नियोजनाच्या पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी आता सुरू झाली आहे. प्रशासकीय स्तरावर आषाढी नियोजनाच्या बैठकांचे सत्र सुरू होते आहे. साधारणपणे 16 लाख […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यात लाखो मासे आणि जलचर मृत्युमुखी

कोल्हापूर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इचलकरंजी परिसरातून काही दिवसांपासून पंचगंगा नदीपात्रात दुर्गंधीयुक्त रासायनिक सांडपाणी आणि मैलामिश्रित पाणी मिसळत आहे त्यामुळे नदीपात्रात मृत माशांचा खच आणि काळ्याकुट्ट पाण्याला आलेली दुर्गंधी यामुळे परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. इचलकरंजी इथल्या प्रोसेसचं रसायनयुक्त सांडपाणी पंचगंगा नदीत सोडलं आहे. हे सांडपणी शिरोळ इथल्या पंचगंगा नदीवरील बंधाऱ्यात आल्यानं […]Read More

पर्यावरण

‘झाड’ चित्रपटातून मिळणार निसर्ग संवर्धनाचा कानमंत्र

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वाढतं तापमान, काँक्रिटीकरण, घटती वनराई यामुळे पर्यावरणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अशातच वनसंपदेच्या जपणुकीचा मुद्दा आता चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येत आहे. झाड या चित्रपटात झाडांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं असून, 21 जून रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. योगेश लिलाधर राजपूत यांनी प्रस्तुती केलेल्या “झाड” या […]Read More

राजकीय

मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे मुस्लीम द्वेषावरच भाषण

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही आणि धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले नाते घट्ट आहे , मतांसाठी आपण काम करत नाही असे सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा जाहीर सभेत राम मंदिर तसेच मुस्लीम द्वेषावर भर देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, आता […]Read More