डब्ल्यू डब्ल्यू एफ व स्वयम अभियान संयुक्त विद्यमाने ५० वा इ-वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह संपन्न.
मुंबई, दि २०
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नुकताच वुमन वेल्फर फोरम मुंबई,डब्ल्यू डब्ल्यू एफ आणि स्वयं अभियान गिरगाव मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच गिरगाव येथील स का पाटील मैदान येथे शंख वाजून या उपक्रमाची सुरुवात केली.त्यावेळी स्थानिक नगरसेविका रिटा मकवाना मॅडम आणि संस्थेचे अध्यक्ष कल्पना शिंदे,प्रमुख सल्लागार दिलीप गाडेकर, संचालिका स्मिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि स्वयं अभियानच्या जानवी गुर्जर प्राजक्ता रानडे व पूर्व देवधर यांच्या सहकार्याने ५० वा इ-वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह प्रमोद नवलकर मार्गावर संपन्न झाला.गेली ५०महिने विभागातील नागरिक दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी नवलकर चौक,सका पाटील उद्यानाजवळ ई-वेस्ट कलेक्शन करतात.त्याला स्थानिक नागरिकांनी भरभरून साथ दिल्यामुळे आजचा हा ५० वा ई-वेस्ट कलेक्शन ड्राईव्ह यशस्वी होत आहे.यावेळी नगरसेविका श्रीमती रिटा मकवाना यांनी या उपक्रमाचे कौतुक करून पुढील काही दिवसात मुंबई महानगरपालिकेतर्फे क्लीन लीग २०२६ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी असेच सहकार्य करा असे आवाहन केले. या उपक्रमांतर्गत श्रीमती अलका बेडेकर,श्रीमती शुभांगी सारंग व भूषण शितूत या मंडळींनी कापडी पिशव्या देऊन त्याचा वापर करावा असा संदेश दिला. यावेळी सी विभागातून परिवेक्षक विजय सोळुंके, कनिष्ठ पर्यवेक्षक भागवत केदार व विजय जाधव उपस्थित होते.डब्ल्यू डब्ल्यू एफ तर्फे अभियानातील जानवी गुर्जर प्राजक्ता रानडे व पूर्वा देवधर या प्रमुख तीन कार्यकर्त्यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. आजच्या दिवशी १५० किलो ही वेस्ट कलेक्शन झाले. याकरिता पावसाळी कालावधीत जागा मालक दिल्ली मोरया यांचेही सहकार्य लाभले. डब्ल्यूडब्ल्यूएफ संस्था सी विभागामध्ये २०१५ते २०२४ या कालावधीत सुका कचरा वर्गीकरण केंद्र चालवीत होत्या.त्याचे कौतुक ही महानगरपालिके प्रमाणपत्र देऊन केले. स्वयं अभियानाच्या वतीने उपस्थित सर्वांना व नागरिकांना मिठाईचे वाटप करून सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन त्यांच्या सन्मान केला.JS/ML/MS