यंदाचे विश्व साहित्य संमेलन पुण्यात
पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्व साहित्य संमेलन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यात होईल. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर होणार्या या संमेलानाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या संमेलनाला उपस्थित राहतील. अशी माहिती राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा विभाग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. फर्ग्युसन महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मधु मंगेश कर्णिक आणि अभिनेता रितेश देशमुख यांचा या संमेलनात सत्कार होणार होईल असेही सामंत यांनी सांगितले. मराठी कशी बोलू नये यासाठी या संमेलनात संजय राऊत यांना आमंत्रित करता येईल . राज्य सरकारची सर्व परिपत्रके मराठीतून निघतील याची खबरदारी घेऊ. मराठी माणसावर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास अद्दल घडवली जाईल असेही त्यांनी सांगितले.
बीडचा प्रकार आणि उद्योग जगताचा काहीही संबंध नाही. धनंजय मुंडे प्रकरणावर मी भाष्य करणं बरोबर नाही.
उद्योजकांसाठी एन आर आय पॉलीसी करण्याचा विचार आहे. परदेशात स्थाईक झालेल्या उद्योजकांना इथे उद्योग यामुळे सुरु करता येईल. आदित्य ठाकरेंना असुरक्षितता वाटत असेल त्यामुळे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटले असतील , त्यांनी आम्हाला बर्फावर झोपवण्याची धमकी दिली होती असे सामंत यावेळी म्हणाले.
ML/ML/SL
10 Jan. 2025