जागतिक अर्थव्यवस्था कोरोना पूर्व पातळीवर 2022 मध्ये पोहोचणार – मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे मत

 जागतिक अर्थव्यवस्था कोरोना पूर्व पातळीवर 2022 मध्ये पोहोचणार – मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे मत

नवी दिल्ली, दि.12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जागतिक पतमानांकन संस्था मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसचे (Moody’s Investors Service) मत आहे की कोरोना साथीमुळे घसरलेली पत (credit)अल्पकालीन आहे, परंतु जगभरातील बहुतांश अर्थव्यवस्था (World economy) पूर्व-कोरोना पातळीवर (pre covid-19 level) पुढील वर्षी 2022 पर्यंत पोहोचतील. गेल्या वर्षी 2020 मध्ये 11 मार्चला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाला साथ घोषित केली होती आणि त्यानंतर जगभरात त्याने धुमाकुळ घातला. त्यामुळे जगभरातील अर्थव्यवस्थेवर तीव्र परिणाम झाला आणि बाँड डिफॉल्टमुळे पत घसरण झाली.
मुडीजने (Moody’s) आपल्या जागतिक अहवालात म्हटले आहे की कोव्हिड -19 मुळे (Covid-19) जगभरात पत-संबंधित आव्हाने निर्माण झाली, परंतु ही घसरण आणखी काही काळ राहील. मुडीजचा अंदाज आहे की जागतिक पुनर्प्राप्तीची गती मंद असेल आणि सुक्ष्म आर्थिक दृष्टीक्षेपासंदर्भातील अनिश्चितता सामान्यपेक्षा जास्त राहील. मुडीजचे म्हणणे आहे की उत्परिवर्तनांमुळे कोरोना विषाणू सोबत जगण्याची सवय लावून घ्यावी लागेल.

कोरोनाची गती लसीकरण कार्यक्रमावर अवलंबून
speed of the corona depends on the vaccination program

मुडीजच्या (Moody’s) मते, साथ मंदावल्यानंतर धोरणात्मक कृती, आर्थिक घडामोडी आणि आर्थिक बाजाराला आधार देतील. धोरणकर्ते दीर्घ काळासाठी आर्थिक घडामोडींना समर्थन देत राहतील आणि काही बाबतीत ते अनेक वर्षे समर्थन देतील. लसीकरण मोहीम अधिक वेगाने झाल्यावर यावर्षी 2021 मध्ये कोरोनाची (corona) साथ हळूहळू कमी होईल, अशी आशा मूडीजने व्यक्त केली आहे. यामुळे सरकारला टाळेबंदी संदर्भातल्या निर्देशात शिथिलता देता येईल. परंतू ज्याठिकाणी लसीकरण धीम्या गतीने होईल, त्याठिकाणी कोरोना संसर्गाशी संबंधित चिंता कायम रहातील.

कोरोनासोबत जगायला शिकणे आवश्यक
Must learn to live with Corona

जागतिक पतमानांकन संस्थेचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूमधील (corona virus) नवीन उत्परिवर्तन जास्त संसर्गजन्य असल्यामुळे परिस्थिती सामान्य होण्याबाबत अद्याप शंका व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत, मुडीजचे म्हणणे आहे की आता कोरोना विषाणूंसोबत जगायला शिकणे आवश्यक आहे आणि कोरोना संसर्गाची प्रकरणे कमी करण्याचे प्रयत्न करायला हवेत. पतमानांकन संस्थेने सांगितले आहे की साथीमुळे झालेल्या पत दुष्परिणामा संदर्भात अनेक मानांकन कृती केल्या गेल्या आणि आता या वर्षी 2021 मध्ये जर जागतिक अर्थव्यवस्था किंवा वित्तीय बाजाराला कोणताही मोठा धक्का लागला नाही तर पत मानांकनाचा घाऊक आढावा घेतला जाणार नाही.
Moody’s Investors Service, a global credit rating agency, believes that the credit crunch due to the corona mate is short-lived, but that most world economies will reach the pre-corona level (pre-covid-19 level) by 2022. Moody’s says it is important to learn how to live with corona coronavirus and try to reduce cases of corona infection.
PL/KA/PL/12 MAR 2021
 

mmc

Related post