घाऊक महागाई आठ वर्षातील सर्वोच्च पातळीवर

 घाऊक महागाई आठ वर्षातील सर्वोच्च पातळीवर

नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किरकोळ महागाई (Retail inflation) दर वाढीनंतर आता घाऊक महागाई (Wholesale inflation) दरानेही सर्वसामान्यांना धक्का दिला आहे. घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) (WPI) मार्चमध्ये 3.22 टक्क्यांनी वाढून 7.39 वर गेला आहे. फेब्रुवारीत तो 4.17 टक्के होता. मार्च महिन्यात कच्च्या पेट्रोलियम पदार्थांच्या (crude petroleum products) किंमती भडकल्याने घाऊक महागाई 8 वर्षांमधील उच्चांकावर गेली आहे. महागड्या कच्च्या तेलाच्या उत्पादनांमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी देशात विक्रम केला आहे.

मार्चमध्ये सर्व वस्तूंची महागाई वाढली
Inflation in all commodities rose in March

सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये घाऊक किंमत निर्देशांकाची (WPI) सर्व कमोडिटिजच्या महागाई दरामध्ये वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार मार्चमधील प्राथमिक वस्तूंमध्ये महागाईचा दर 6.40 टक्के होता. तर फेब्रुवारीमध्ये प्राथमिक वस्तूंचा महागाई दर 1.82 टक्के होता. इंधन आणि उर्जा विभागात सर्वात जास्त 9.67 टक्क्यांची वाढ झाली आहे. मार्चमध्ये इंधन आणि उर्जा विभागात महागाई दर 10.25 टक्के होता जो फेब्रुवारी महिन्यात 0.58 टक्के होता. मार्चमध्ये उत्पादित वस्तुंचा महागाई दर 7.34 टक्के होता, तर फेब्रुवारीमध्ये 5.81 टक्के होता. त्याच वेळी मार्चमध्ये अन्न निर्देशांकातील महागाई दर 5.28 टक्के होता, जो फेब्रुवारीमध्ये 3.31 टक्के होता.

क्रूड पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसच्या किमतींमध्ये वाढ
Rising crude petroleum and natural gas prices

आकडेवारीनुसार, प्राथमिक वस्तूंमध्ये समाविष्ट असलेल्या कच्च्या पेट्रोलियम (crude petroleum products) आणि नैसर्गिक वायूच्या (Natural Gas) किंमती मार्चमध्ये 8.64 टक्के आणि खाद्यपदार्थांच्या किंमती 1.90 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तर खनिजांच्या किमतींमध्ये (Mineral prices) 0.35 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर अन्नधान्यांच्या किंमती फेब्रुवारीच्या तुलनेत 0.45 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. इंधन आणि उर्जा विभागात समाविष्ट असलेल्या खनिज तेलाच्या किमतींमध्ये 9.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर कोळशाच्या किंमतीत 0.08 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र मार्च महिन्यात विजेच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
आकडेवारीनुसार उत्पादित वस्तु विभागातील एकंदर 22 गटांपैकी 16 गटात समाविष्ट असलेल्या वस्तूंच्या किंमतींमध्ये वाढ दिसून आली. यात फर्निचर, मोटार वाहन, ट्रेलर आणि सेमी ट्रेलर, यंत्रसामग्री आणि उपकरणे, विद्युत उपकरणे, मूलभूत धातू, इतर नॉन-मेटॅलिक खनिज उत्पादने, रबर आणि प्लास्टिक उत्पादने, औषधे, औषधी रसायन आणि वनस्पति उत्पादने, रासायनिक आणि रासायनिक उत्पादने, कागद आणि कागदी उत्पादने, लाकूड आणि तयार उत्पादने, वस्त्र, कापड आणि खाद्य उत्पादने यांचा समावेश आहे. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग व्यतिरिक्त 5 गटात समाविष्ट असलेल्या उत्पादनांच्या किंमतीत घट झाली आहे. यात इतर परिवहन उपकरणे, छपाई, चामडे आणि त्याच्याशी संबंधित वस्तू आणि तंबाखूजन्य पदार्थांचा समावेश आहे. शितपेयांच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

बटाट्याच्या किंमतीत सर्वाधिक घसरण
The biggest drop in the price of potatoes

मार्चमध्ये बटाट्यांच्या (Potatoes) घाऊक किमतींमध्ये सर्वात जास्त 33.40 टक्क्यांची घट झाली आहे. एका वर्षापूर्वी याच काळात बटाट्यांच्या घाऊक किमतींमध्ये 61.36 टक्क्यांची वाढ झाली होती. त्याखेरीज गव्हाच्या घाऊक किंमतीमध्ये 7.80 टक्के, भाज्यांच्या घाऊक दरात 5.19 टक्के आणि अन्नधान्याच्या घाऊक किमतींमध्ये 4.08 टक्के घट झाली आहे. चामडे आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांच्या घाऊक किमतींमध्ये 0.68 टक्क्यांची घट झाली आहे.
After the rise in retail inflation, now the wholesale inflation rate has also hit the common man. The Wholesale Price Index (WPI) rose 3.22 per cent to 7.39 in March. It was 4.17 percent in February. Wholesale inflation rose to an eight-year high in March on account of rising crude oil prices.
PL/KA/PL/16 APR 2021
 

mmc

Related post