पावसाने द्राक्षबागा झाल्या आडव्या…

 पावसाने द्राक्षबागा झाल्या आडव्या…

सांगली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका पूर्व भागाला गारपीटीने झोडपले, द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. vineyards ruied due to rains परवा झालेला पाऊस आणि नुकसानीचे पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. तासगाव तालुक्यात मनेराजुरी, योगेवाडी, सावळज,सिद्धेवाडी, पेड या भागाला वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपिटीने झोडपले. सोमवारी दुपारी चारच्या दरम्यान ही गारपीट झाली. जवळपास अर्धातास गारपीट सुरू होती. त्यामुळे आगाप द्राक्षबागांची छाटणी घेतलेल्या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. छाटणी केलेल्या पिकाला फुटलेल्या काड्यांना गारांचा मारा बसून जखमा झाल्या आहेत.तर काड्या मोडल्या आहेत. पाने तुटून पडली. काही ठिकाणी शेतातील पिकांच्या शेजारी असलेली झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे या बागांना द्राक्षे येण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवले जात आहे.As a result, these orchards are less likely to produce grapes.

या गारपिटीने मोठे क्षेत्र बाधीत झाल्याचे शेतकऱयांनी सांगितले. The hailstorm affected a large area, farmers said. गेली चार वर्षे गारपिटीचा तडाखा तासगाव तालुक्यातल्या द्राक्षबागायतदारांना बसतो आहे. गारा व पावसाने आंबा, व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले.२०१८ रोजी मार्च महिन्यात तासगाव तालुक्यात गारपीट व जोरदार पावसा मुळे २ हजार एकरमधील द्राक्षबागांना फटका बसला होता. तर २०१९ मधे येळावी गावाला गारपिटीचा तडाखा बसल्याने ५०० हेकटर क्षेत्र बाधीत झाले होते. २०२० ला वासुंबे , मतकूणकी, उफळावी, नागाव, कवठेएकंद, कुमठे या गावांना शेकडो हेक्टरला झटका बसला होता.खरडछाटणी नंतर फळपीक छाटणी करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या द्राक्षबागांच्या काड्यांना गारांचा जोराचा मारा बसला आहे. या माऱ्यामुळे कोवळ्या काड्या मोडल्या आहेत. तर काड्यांना जखमा होत पाने तुटून गेली.

ML/KA/PGB

29 Apr 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *