शेतकरी नुकसान आणि कांदा खरेदी यावर विधानसभेत गदारोळ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे त्यामुळे सर्व कामकाज बाजूला सारून यावर चर्चा करावी आणि सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी नियम ५७ अन्वये नाना पटोले यांनी केली , अध्यक्षांनी ती नाकारली , त्यावर विरोधक आक्रमक झाले , यावर मुख्यमंत्र्यानी उत्तर दिलं मात्र विरोधकांनी सभात्याग केला.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी याला पाठिंबा दिला, शेतकरी हवालदिल झालाय, त्याला दिलासा देण्यासाठी सरकारने तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी केली.अधिवेशन सुरू आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहेत ही गंभीर बाब आहे असं छगन भुजबळ म्हणाले.
त्यानंतर विरोधक अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले , घोषणाबाजी सुरू केली. शेतकरी हवालदिल आहे , गर्तेत सापडला आहे, त्याला मदत होत नाही असं बाळासाहेब थोरात म्हणाले. या गोंधळात अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे पुकारली.
पंचनामे पूर्ण झाल्यावर मदत जाहीर करू, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना मदत करायची आहे की सभागृहात गोंधळ घालायचा याचा निर्णय विरोधकांनी घ्यावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
एक लाख एकर क्षेत्र बाधित झालं आहे, मुख्यमंत्र्यानी आश्वासन देऊनही अद्याप कांदा खरेदी सुरू नाही , प्रत्यक्ष जागेवर काहीही मदत होत नाही, हरभरा खरेदी , अद्याप नाही.असं अजित पवार म्हणाले. आम्ही तातडीने पंचनामे सुरू केले , काही काम अद्याप बाकी आहे, आम्ही शेतकऱ्याला मदत देऊ , यापूर्वी ही दिली आहे. विरोधकांनी राजकारण करू नये, मुख्यमंत्री म्हणाले
पुन्हा विरोधक आक्रमक झाले , जागा सोडून पुढे आले.
Nafed ची खरेदी सुरू केली आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत देऊ, आम्ही तुमच्या सारखी पाने नाही पुसत , साडे बारा हजार कोटी दिले आणखी ही देऊ , आम्ही खंबीरपणे शेतकऱ्यांच्या मागे उभे राहू असं मुख्यमंत्री म्हणाले मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
ML/KA/SL
9 March 2023