UN मध्ये रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा प्रस्ताव मंजुर

 UN मध्ये रशिया-युक्रेन युद्ध संपवण्याचा प्रस्ताव मंजुर

न्यूयॉर्क,दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रशिया-युक्रेन युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झाले. संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी (दि.२३) रात्री उशिरा युक्रेनमध्ये शांतता व रशियन लष्कराच्या माघारीविषयी एक प्रस्ताव सादर करण्यात आला. तो दोन तृतीयांश मतांनी पारिति झाला. 141 देशांनी प्रस्तावाचे समर्थन केले. भारत, चीन व पाकसह 32 देशांनी संयुक्त राष्ट्रातील या प्रस्तावावरील मतदानात सहभाग घेतला नाही. तर बेलारूस, उत्तर कोरिया, सीरिया, माली, रशिया, इरीट्रिया व निकारागुआ या 7 देशांनी त्याविरोधात मतदान केले.

११ परिच्छेदांचा हा प्रस्ताव पारित झाल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्विट केले की, ‘हा युक्रेनला मिळणाऱ्या जागतिक समर्थनाचा पुरावा आहे’. दुसरीकडे, रशियाचे यूएनमधील राजदूत दमित्री पोलान्स्की यांनी हा निर्थक प्रस्ताव असल्याचे सांगून फेटाळून लावला. ते ट्विटमध्ये म्हणाले की, ‘या प्रस्तावाने शांतता येणार नाही. उलट युद्ध भढकवणाऱ्यांचा विश्वास वाढेल’.

SL/KA/SL
24 Feb. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *