शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे : वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी 

 शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे : वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी 

नवी दिल्ली, दि. 26  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आपल्या देशातला शेतकरी पेट्रोल-डिझेलचा , ऊर्जेचा पर्याय देण्यास सक्षम असून शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे, असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं.  गडकरी यांच्या हस्ते  आज सांगली आणि सोलापूर शहरांना रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या बोरगाव – वाटंबरे राष्ट्रीय महामार्ग 166 आणि  सानंद जत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 165  या  दोन महामार्गांचे आज लोकार्पण करण्यात आले त्याप्रसंगी ते  बोलत होते.

यावेळी  जयंत पाटील ,जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य , दत्तात्रय भारणे ,सार्वजनिक बांधकाम मंत्री  महाराष्ट्र राज्य आणि डॉ. विश्वजित कदम सहकार ,कृषी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य  आणि खासदार संजयकाका पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.

येणाऱ्या काळात साखरेऐवजी इथेनॉल आणि बगासपासून बिटूमीन बनवायला प्राधान्य द्यायला हवे,असे सांगत गडकरी पुढे म्हणाले की,बिट्यूमिनचे रस्ते आता आम्ही तयार करत असून  पुण्याच्या प्राज इंडस्ट्रीने उसाच्या चिपाडापासून आणि बायोमासपासून बायो -बिट्यूमिन तयार केलं आहे. येणारा काळ बिट्यूमिनचा असून राष्ट्रीय महामार्गांच्या बांधणीत ते अनिवार्य करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

महाराष्ट्रातले सांगली ही हळदीची राजधानी म्हणून ओळखले जाते. अनेक साखर कारखाने इथे आहेत. सांगोला आणि जतला ऐतिहासिक महत्त्व आहे. सांगोला डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यात देशातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत. आगामी काळात इथल्या रस्ते वाहतुकीत प्रचंड वाढ होणार आहे. यामुळे  कोल्हापूर-सोलापूर मार्गावर जलदगतीने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. ऊस, हळद, डाळिंब, द्राक्ष यासारख्या शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार आहे. या शिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळणार असून लोकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे.

 

HSR/KA/HSR/26 March  2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *