दोन आठवड्यांतील जोरदार तेजीनंतर बाजारात (Stock Market) घसरण.

 दोन आठवड्यांतील जोरदार तेजीनंतर बाजारात (Stock Market) घसरण.

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत   मागील दोन आठवड्यांतील जोरदार रॅलीनंतर गेल्या आठवड्यात बाजारात दबावाचे वातावरण होते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती,जगातील काही देशातील कोविडची वाढती प्रकरणे, रशिया-युक्रेन मधील चिघळत चाललेला वाद,आखाती प्रदेशातील अनिश्चितता,रुपयाची घसरण ,वाढती महागाई यामुळे गेल्या आठवड्यात बाजारात नकारात्मकता जाणवली.

गेल्या आठवड्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) ५,३४४.३९ कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आणि देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी (DIIs)२,८२०.७२ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. तथापि, मार्च महिन्यात आतापर्यंत FII ने ४६,९६१.५७कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली आणि DII ने ३४,४४०.७४ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.

पुढील आठवड्यात बाजाराचे लक्ष रशिया-युक्रेन मधील घडामोडी,रुपयाची चाल,कच्च्या तेलाच्या किमती,वस्तुंच्या चढत्या किमती(महागाई)याकडे असेल.

भारतात कोविडमुळे लादलेले निर्बंध मागे घेतल्यानंतर, हॉस्पिटॅलिटी, मल्टिप्लेक्स, वाहतूक यासारख्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी दिसून येईल.
निफ्टीकरिता १६,८००-९०० हा खालचा स्तर महत्वाच्या राहील जर निफ्टीने १७,३०० चा स्तर तोडला तर १७,५०० चा वरचा स्तर गाठेल.

बाजारात नफावसुली सेन्सेक्स ५७१ अंकांनी घसरला. Sensex falls 571 points
मागील आठवड्यातील तेजीनंतर सोमवारी भारतीय बाजारात एक टक्काची घसरण झाली. संमिश्र जागतिक संकेत व पुन्हा क्रूडच्या वाढत्या किमतीमुळे निर्माण झालेली महागाईची भीती यामुळे बाजार पडला सेन्सेक्स मध्ये ६०० अंकाहून अधिक घसरण झाली. रशिया आणि युक्रेनमधील संबंधात लक्षणीय सुधारणा न झाल्याने व आखाती प्रदेशातील अनिश्चितता यामुळे तेलाच्या किमती वाढल्या.बाजाराने दिवसाची सुरुवात सकारात्मक केली होती परंतु सुरुवातीच्या तासांमध्ये नफावसुली झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ५७१.४४ अंकांनी घसरून ५७,२९२.४९ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने १६९. ४५ अंकांनी घसरून १७,११७.६० चा बंददिला.

सेन्सेक्स ६९६ अंकांनी वधारला. Sensex up 696 points
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि यूएस फेडकडून आर्थिक धोरण कडक करण्याच्या संकेतांमुळे मंगळवारी बाजाराची सुरुवात घसरणीने झाली.परंतु युरोपियन बाजार सकारात्मकतेने उघडल्याने देशांतर्गत बाजारानेही आपला गियर बदलला आणि जोरदार पुनरागमन केले. युक्रेनच्या शांततेच्या पुढाकाराच्या चिन्हांनी बाजारात उत्साहाचे वातावरण पसरले. सेन्सेक्स ७०० अंकांनी वाढला. ऑटो,बँक, आयटी, तेल आणि गॅस समभागांमधील जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी १ टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले. बाजार बंद होताना सेन्सेक्स ६९६ अंकांनी वधारून ५७,९८९ या स्तरावर बंद झाला व निफ्टी १९७ अंकांनी वधारून १७,३१५ चा बंददिला.

संमिश्र बातम्या व नफावसुलीचा बाजारावर असर. Profit-taking, mixed news flow weigh on market
रशिया आणि युक्रेन यांच्यातील उच्चस्तरीय चर्चेदरम्यान होणाऱ्या प्रगतीच्या आशेने यूएस, युरोपियन आणि आशियाई बाजारांच्या तेजीच्या संकेतांमुळे भारतीय बाजार बुधवारी मजबूत उघडले.परंतु दुपारच्या सत्रात बाजाराने नफावसुलीमुळे तेजी गमावली. डॉलरच्या तुलनेत रुपयातही कमजोरी दिसून आली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ३०४ अंकांनी घसरून ५७,६८४ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ६९ अंकांनी घसरून १७,२४२ चा बंददिला.

प्रचंड चढउतारामुळे बाजार नकारात्मक बंद. Market ends a tad lower after a volatile session
जागतिक बाजारातील कमजोर संकेतांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली.संपुर्ण दिवस बाजार नकारात्मकच राहिला. बाजरात प्रचंड चढउतार पाहावयास मिळाले. आय.टी ,फार्मा ,ऑईल व गॅस क्षेत्रात खरेदी झाली तर बँकिंग क्षेत्रात घसरण झाली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स ८९ अंकांनी घसरून ५७,५९५ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने २२ अंकांनी घसरून १७,२२२ चा बंददिला.

आठवड्याचा शेवट घसरणीने.Markets end week in the red
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. युक्रेन-रशिया युद्ध, इंधन दरवाढ आणि मिश्र आशियाई संकेत यामुळे बाजाराच्या सेंटीमेंट वर परिणाम झाला. रियल्टी वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांत विक्रीचा दबाव होता.बराच काळ चालू असलेला पूर्व युरोपमधील जिओपॉलिटिकल तणाव व वाढत्या किमती यांचा हळूहळू मागणी आणि नफ्यावर होत असलेला परिणाम त्यामुळे इक्विटी बाजारातील प्रवाह आणि मूल्यांकनांवर देखील परिणाम जाणवू लागला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स २३३ अंकांनी घसरून ५७,३६२ वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टीने ६९ अंकांनी घसरून १७,१५२ चा बंद दिला.After two weeks of strong gains, the stock market fell.

(लेखक शेअर बाजार तज्ञ, तसेच Technical and Fundamental Analyst आहेत.) jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB

26 Mar 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *